Thursday, 24 October 2019

प्राण बाकी आहे

संपलेलो आज नाही प्राण बाकी आहे
हारलेलो खास नाही प्रण बाकी आहे

संकटांच्या वादळानो मोडलो मी नाही निश्चयाचा त्यात मोठा त्राण बाकी  आहे

सोडले मी जाहले जे  खंत थोडी होती
शब्दबाणांचे तुमच्या त्या व्रण बाकी आहे

उत्तरे  देणार  साचे वेळ येता माझी
आत माझ्या सह्यतेचा बाण बाकी आहे

वाचुनीया ग्रंथ मोठे,ज्ञान कोणा झाले
अनुभवाचे फक्त येथे ज्ञान बाकी आहे


बाजी©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...