Wednesday 27 May 2020

साजी चतुरंग वीर रंग मे तुरंग चढी

महाकवी भूषणाचा शिवरायांच्या सैन्य संचलनावरचा अप्रतिम आणी माझा सर्वाधिक आवडता  छंद त्याचा मी केलेला त्याच छंदातील पद्यानुवादाचा प्रयत्न .


साजि चतुरंग बीररंग में तुरंग चढ़ि।
सरजा सिवाजी जंग जीतन चलत है॥
भूषन भनत नाद विहद नगारन के।
नदी नद मद गैबरन के रलत हैं॥
ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल,
गाजन की ठेल-पेल सैल उसलत है।
तारा सों तरनि घूरि धरा में लगत जिमि,
थारा पर पारा पारावार यों हलत है

छंद -कवित्त मनहरण , ३१ वार्णिक छंद ज्यात १६,१५ यती आहे
अलंकार -अनुप्रास (वृत्यानुप्रास)

पद्यानुवाद -

सज्ज चतुरंग वीर रंगात तुरंगारुढी
सर्जा शिवाजी जंग जिंकण्या चालतो आहे
भूषण म्हणतो नाद विहद नागार्याचा 
नदी सम मद हत्तींतून वाहतो आहे
गर्दी फैले कोलाहले खळबळ माजलेली
हत्तींच्या मत्त चाले सैल उसळत आहे 
चंड चाले धूळी मुळे ताराची तरनी जणु
थाळी हले पारा तशी धरा हलते आहे
बाजी© 

अर्थ-
सजुन धजुन दिमाखदार अश्वारुढ सेना घेऊन सर्वशिरोमनी (सरेजाह)
शिवाजी युद्ध जिंकण्याकरिता निघालेला आहे 
भुषण म्हणतो नगार्याचा अवाज मोठमोठ्याने होत आहे
मत्त हत्तींच्या मतिष्कातुन मदप्रवाह नदीसारखा वाहत आहे
रस्त्याने कोलाहल करित चाललेल्या सैन्यामुळे सगळीकडे खळबळ
माजलेली दिसते
महाकाय हत्तीदलापुढे पर्वत पर्वतासन देखील उखडले जात आहेत
शिवाजीच्या प्रबळ सेनेमुळे असमंतात उठलेल्या धुळीने सुर्य ही झाकला आहे
तसेच या प्रचंड सेनेच्या चालण्याने समुद्र पर्वत  देखील हलत आहेत

बाजी© 
omkarpandav.blogspot.com

Saturday 16 May 2020

मराठवाडा

शौर्य धैर्य अन भक्तीचा ,अखंड अमृत ओढा 
मराठीचे हृदय विहंगम ,आपला मराठवाडा

बीड जालना हिंगोली लातुर अन परभणी 
नांदेड धाराशिव आहे औरंगाबाद राजधानी 

सहस्त्रकुंड सौताडा शैवभूमी कपिलधार प्रपात
गौताळा रामलिंग नायगाव माहुरचे अरण्य घनदाट

गोदावरी माय मांजरा,बिंदुसरा इथे वाहती
पुर्णा पैनगंगा सिंदफणा,मराठवाडा फुलविती

तूर मुग उडीद मटक्यांनी टाच कणग्या भरती
तीळ ,मोहरी, कार्हळे ,जवसाची पिके डोलती 

काळ्या मातीची सुपीकता आम्ही वर्णावी किती
गहु बाजरी ज्वारी रुपाने पिकतात इथे मोती 

दुष्काळाने हतबल होतो लढणे सोडत नाही
मातीची या साथ आम्हाला कधी सोडवत नाही

सातवाहन पराक्रमी ,राष्ट्रकुटांचे मुळ
यादवांची देवनगरी, इथलेच भोसले कुळ

चालुक्यीय कंधार मोठा उदगीर परांडा विकट
रमणीय नळदुर्ग मोठा भयंकर धारुर कोट 

वसई भांगसी अंतुर आणी सुतांडा उपकोट
मध्य भागी राजधानी उभा देवगिरी चखोट

शिवशंकराचे स्थान येथे परळी वेरुळ औंढा
श्री रेणूका ,तुळजाई कुलदैवी सकलाची अंबा

श्रीगुरु सचखंड तख्त महद्तीर्थ शिखांचे
कचनेर जटवाडा कुंथलगिरी तीर्थ पवित्र जैनांचे

इथेच अवतरला कृष्ण ज्ञानेश्वरांच्या रुपाने
नाथा घरी वाहीले पाणी भगवान श्रीखंड्याने

महद्भक्त नामदेवा हातचा घास खाई पांडुरंग 
रामदास समर्थ कलीयुगीचा अवतार हनुमंत

विविधतेत एकतेला येथे वेरुळास कोरले
शांतीरुप अजिंठा लेणे मराठवाड्यात घडले

दख्खनी ताज उभा येथे, हेमाडपंती मंदिरे खास
चैत्य विहारांची नांदी जणु विश्वकर्म्याचा निवास

हाल राजाची सप्तशती महाराष्ट्रीचा आद्यग्रंथ
मुकूंदाच्या विवेकसिंधूत वाहतो मराठी गंध

पैठणीचा दिमाख भारी अजून जगी साजतो
शाही हिमरु शालू इथला सर्वानाच भावतो 

भाजी भाकरी  प्रिय  सोबती कांदा ठेचा थोडा
भाषेने तिखट बोलीने गोड आपला मराठवाडा

बाजी© 

Friday 1 May 2020

श्रेष्ठ महाराष्ट्र

अभंग सुंदर अजिंक्य धीट्टा ,कणखर तरी सौम्य असे
निबीड घोर तो अजिंक्य ऐसा ,जणु धरेवर स्वर्ग वसे
भारत भू चा श्रीविष्णू जो,अरिहंता महारुद्र असे
सुकिर्तीशाली सर्ववैभवी , महा श्रेष्ठ  महाराष्ट्र असे
जिव्हेस येथे खडग धारी वरी ,वाहे पयाचे स्त्रोत तरी
श्रीमंती बहु मनात मोठी, तिजोरी रिकामी असे जरी 
उंच सह्य सम चरित्र उत्तुंग्,पाय सदा तरी धरेवरी
देव देश अन धर्मासाठी ,बलिदानाचे मानकरी
किती निरखिले किती पाहिले अंदाज लावण्या  क्लिष्ट असे
सुकिर्तीशाली सर्ववैभवी,महा श्रेष्ठ महाराष्ट्र असे


बाजी© 

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...