Monday, 27 December 2021

शिवराज अष्टक

हिंदु शौर्य तेज अंभ  शिऽव राज भूपती
कोटि सुर्य कोटी चंद्र क्षात्र तेज नृपती 
क्रूर काळ दंड धारि शिऽव म्लेंच्छ मारका
देव देश धर्म पाल शिऽव युग नायका 

पारतंत्र अंधकार अंतकाल शिव रवी 
आफजल्ल उदर विदर शिवसिंह नरहरी
बुद्धि थोर शौर्यघोर हिंदु राज्य स्थापका
देव देश धर्म पाल शिऽव युग नायका 

सह्य सिंह दख्खणेंद्र दूर्ग प्रिय रायरी
अश्व कटक भूवरी अजेय सिंधु सागरी
शाम श्वेत म्लेंच्छ दुष्ट क्रूर शत्रु मर्दका 
देव देश धर्म पाल शिऽव युग नायका 

किर्तिवंत या अनंत खंड मंडलांतरी
शिव राज किर्तिवंत एक ची दिगंतरी 
गुंड पुंड लक्ष झूंड न्याय धाक दंडका
देव देश धर्म पाल शिऽव युऽग नायका 

साधू संत भाट ब्रह्म वृंद ज्यास वंदिती
रुद्र शत्रु रयत राम शिव राज बोलती
कर्ण धर्म भीम पार्थ गुण समुच्च नायका
देव देश धर्म पाल शिऽव युग नायका 

मातृभक्त भक्तिसिंधु पितृशौर्य गर्वि तो
मां भवानि भक्त स्त्रीस मातृतुल्य लेखतो
मां भवानि मातृभक्त मातृभूमि पूजका 
देव देश धर्म पाल शिऽव युग नायका 

निर्बलास मित्र हस्त लोक प्रिय प्रियसा
दीन मित्र गर्व रिक्त लोक राज राजसा
लोक रक्षणार्थ छत्र राज चिन्ह धारका
देव देश धर्म पाल शिऽव युग नायका 

सुस्त राष्ट्र जागृतार्थ शिव राय मंत्र हा
शौर्य धैर्य स्फुर्तिदायि शिवशंभु मार्ग हा
भक्त बाजी सेव्य अर्पि काव्य पुष्प अष्टका
देव देश धर्म पाल शिऽव युग नायका 

कवि-बाजी राधाकृष्ण पांडव copyright.
सर्व हक्क लेखकाधिन.

Thursday, 16 December 2021

मी कधी

मी कधी, तुझ्या सोबती , कधी गुंतलो ,कळे ना मला
तू कधी ,पुन्हा तू कधी,कधी भेटसी , मला सांग ना

आभास तू ,का जाहली , स्वप्नात माझ्या,तू ये ना जरा 
स्वप्नात तू,राहू नको ,कधी सोबती ,तू ये ना जरा
तू कशी,जशी चांदणी ,कधी रातीला ,तू ये ना जरा
मी तुझा,होऊ दे तुझा,मला गुंतू दे,तू ये ना जरा

तू कधी ,मनाला कधी,कधी गुंफले,कळे ना मला
का तुझी,मनाला तुझी,का ओढ लागे ,कळे ना मला
तू आता,मला सोबती ,सवे चालण्या, तू ये ना जरा
तू असा ,तो चंद्र जसा ,सवे चांदणीच्या तू ये ना जरा
तू असा,जसा श्वास हा ,हृदयात ये,तू ये ना जरा

Tuesday, 14 December 2021

मृत्युवरी स्वार

मृत्युवरी स्वार होतो मराठाच, मृत्युस मारीत जातो रणी 
धर्मात, युद्धात, शौर्यात धैर्यात जो अग्रणी तो मराठा धनी 

युद्वात आहे पुढे आपल्या कोण , पाहे मराठा न केव्हा तरी 
हा आत्मविश्वास ऐसाच नाही, काळास तुम्ही विचारा तरी
दूर्दांत गर्विष्ठ हरवून युद्धात गर्वास चेंदून
आम्ही करी

आम्हीच रोखून आक्रंत कारी, किती मारले गाडलेले रणी
मृत्युवरी स्वार होतो मराठाच, मृत्युस मारीत जातो रणी 


दिल्लीत गर्जून सिंहासनी श्री शिवाजी बनूनी आव्हानलो
औरंग अफजल्ल आलेत जे ही फाडून छातीवरी नाचलो 
खिंडीत बाजी बनूनी यमालाच शंभू बनूनी कधी भांडलो

दर्यासही धाक लावी मराठाच अटकेस जिंकून जातो क्षणी 
मृत्युवरी स्वार होतो मराठाच, मृत्युस मारीत जातो रणी 
 बाजी राधाकृष्ण पांडव copyright

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...