Friday 20 January 2017

आयुष्याच्या फडातल्या कुस्तीत मि पुन्हा  उठेन.!

वेळ पडली वैर्याची
                म्हणु घाबरणे नाही
फासे प्रयत्नांचे पडले उलटे
               म्हणुन ही माघार नाही
लांब उडी पुढे घेण्यासाठी
                   माग कधी जाव लागतं
हरलो म्हणुन सगळच संपल
               असही काही खरच नसतं
करुन चित ,नियतीला
                 वाटत असेल संपलो मि !
माखुन पराभवांच्या धुळीत
                    पुन्हा उभा राहीन मि
अनुभवाची धुळच ती पकड
                 भविष्याची मजबुत असेन
आयुष्याच्या फडातल्या
                 कुस्तीत मि पुन्हा  उठेन.!

बाजी©

तरुणांचा बोलघेवडेपणा

भारतातल्या स्वतःला देशप्रेमी म्हणवणार्या आधुनिक क्रांतीकारची संख्या तशी खुप झालीय ,ही चांगली गोष्टय
पण यातील शेकडा नव्वद फक्त  बोलघेवडे
कट्यावर नाहीतर आणखी कुठेतरी बसायच आणी
देश इतीहास ,राजकारण आणी संभाव्य सुधारणा यावर कुटाळक्या करायच्या परिणाम
निष्कर्ष शुन्य यात फक्त हेच प्रस्थापित करयचे की बघा मि किती अभ्यासु !
बाकी राहु द्या हो ,प्रत्यक्ष वागायची पाळी आली की आम्ही बिझी असतो ,
त्याग वैगेरे फक्त बोलायच्या गोष्टी करायच्या वेळी कुठे काय!
देशात परिवर्तन हवय ?करु लागतोस सुरुवात !नाही ना !
का वेळ नाही !
मग कशाला गोष्टी करतोस !
जातीभेद समानता ! नुसत्या गप्पा ठोकायच्या प्रत्यक्षात काय
जातीवाचुन पान हलेना?
सकाळ दुपार तेच तेच मानवतेवर बोलणं
.....मानवतासाठी काम करायला वेळ नाही म्हणे अरे यासाठी वेळृ नव्हे फक्त संवेदनशील मन हवय !
राष्ट्रासाठी म्हणे
....राष्ट्राला तुमच्या एकट्याची गरजच नाही
गरज आहे ती तुम्ही ज्या अनेकांपैकी एक आहात त्यांची
मग कशाला गळा फाडताय ,
...गर्जनारे बरसत नाहीत हा नियम आहे ,
आपणही तसेच का,
....राष्ट्राला तुम्ही खुप मोठ्ठा त्याग करावा  हे अभिप्रेत नाही फक्त खारीचा वाटा तरी  उचलावा हे अवश्य !!

बाजी ©

Saturday 14 January 2017

तुजविण ही प्रभातपुष्पे

तुजविण ही प्रभातपुष्पे उमलता राहीली
छेडणारी द्वाड थंडी
आज  बघ लाजली
स्पर्श तीरीच्या वाळुचाही जाणवु लागे तप्तसा
मि तरी एकटासा एकांत ही कल्लोळभरा
तुजवीण जिवनगाणी शब्दरुप राहीली
रचलेली अनुराग पद्यही शब्दशुन्य जाहली
रसिक से मन परी दाटली बहु अरसिकता
मि तरी एकटासा एकांतही कल्लोळभरा
तुजविण बघ मनसागर जाहला जीवहीनसा
वाळवंटीचा निवडुंग जणु वाटु लागला देह हा
बाग फुलांची फुललेली जरी कंटक लागे प्रियसा
मि तरी एकटासा एकांतही कल्लोळभरा

बाजी ©

Friday 13 January 2017

पानिपत बलिदान 14जानेवारी 1760 ..महार्ष्ट्रावर संक्रांत कोसळली होती पानीपतच्या रुपाने!

प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी
महाभारतासम रण दिसले
कुरुक्षेत्रातील भुमी
बसले होते स्वकिय काही म्लेंच मुघलांच्या पायी
लेकीबाळी त्या घरी घालती
हिंदु अस्मिता का विसरुनी
परि दक्खनी आम्ही मराठे
वारस शिवरायाचे
देवदेश अन धर्मास्तव ही
सर्वस्व ही राख करावे
पानिपत ते एकच काय
अशा आहुत्या लक्ष करु
हरलो जरी हि रणांगणी जेत्याला जिंकुणी मरु

पानीपत दिवस
श्रीमंत पेशवे सदाशिवराभाऊ  सर्व शहीद सरदार आणी लाखभर ज्ञातअज्ञात हुतात्म्यांस
विनम्र अभिवादन
बाजीराव पांडव राक्षसभुवनकर

कुछ भुल गयी हो

कुछ छोड गयी थी तुम शायद
कुछ लौटाना बाकी था
मिल गये थे हम राहो मे
बस पता पुछना बाकी था
कुछ भुल गयी थी तु  शायद
याद दिलाना जरुरी था
मेल बनाने कुछ लब्जो का
कुछ तो बोलना बाकी था
.
.बाजी©

Tuesday 10 January 2017

शिवस्तवन

धीरा आदीवीरा अनंता तु भयंकरा
त्रीनेत्रा शशिधरा हे सत्यरुप शिवसुंदरा
निळकंठा उमापती नमो तुवा हरीप्रियकरा
दे शक्ती मज आदीभैरवा हे सत्यरुप शिवसुंदरा
अघोरात्रीपुरांतका जटाधरा हे जग्द्पिता
कांमांतक वैराग्यनृप  तु कैलाशपती श्रीशंकरा

बाजी©
9-01-2017

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...