प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी
महाभारतासम रण दिसले
कुरुक्षेत्रातील भुमी
बसले होते स्वकिय काही म्लेंच मुघलांच्या पायी
लेकीबाळी त्या घरी घालती
हिंदु अस्मिता का विसरुनी
परि दक्खनी आम्ही मराठे
वारस शिवरायाचे
देवदेश अन धर्मास्तव ही
सर्वस्व ही राख करावे
पानिपत ते एकच काय
अशा आहुत्या लक्ष करु
हरलो जरी हि रणांगणी जेत्याला जिंकुणी मरु
पानीपत दिवस
श्रीमंत पेशवे सदाशिवराभाऊ सर्व शहीद सरदार आणी लाखभर ज्ञातअज्ञात हुतात्म्यांस
विनम्र अभिवादन
बाजीराव पांडव राक्षसभुवनकर
No comments:
Post a Comment