वेळ पडली वैर्याची
म्हणु घाबरणे नाही
फासे प्रयत्नांचे पडले उलटे
म्हणुन ही माघार नाही
लांब उडी पुढे घेण्यासाठी
माग कधी जाव लागतं
हरलो म्हणुन सगळच संपल
असही काही खरच नसतं
करुन चित ,नियतीला
वाटत असेल संपलो मि !
माखुन पराभवांच्या धुळीत
पुन्हा उभा राहीन मि
अनुभवाची धुळच ती पकड
भविष्याची मजबुत असेन
आयुष्याच्या फडातल्या
कुस्तीत मि पुन्हा उठेन.!
बाजी©
No comments:
Post a Comment