Friday, 20 January 2017

तरुणांचा बोलघेवडेपणा

भारतातल्या स्वतःला देशप्रेमी म्हणवणार्या आधुनिक क्रांतीकारची संख्या तशी खुप झालीय ,ही चांगली गोष्टय
पण यातील शेकडा नव्वद फक्त  बोलघेवडे
कट्यावर नाहीतर आणखी कुठेतरी बसायच आणी
देश इतीहास ,राजकारण आणी संभाव्य सुधारणा यावर कुटाळक्या करायच्या परिणाम
निष्कर्ष शुन्य यात फक्त हेच प्रस्थापित करयचे की बघा मि किती अभ्यासु !
बाकी राहु द्या हो ,प्रत्यक्ष वागायची पाळी आली की आम्ही बिझी असतो ,
त्याग वैगेरे फक्त बोलायच्या गोष्टी करायच्या वेळी कुठे काय!
देशात परिवर्तन हवय ?करु लागतोस सुरुवात !नाही ना !
का वेळ नाही !
मग कशाला गोष्टी करतोस !
जातीभेद समानता ! नुसत्या गप्पा ठोकायच्या प्रत्यक्षात काय
जातीवाचुन पान हलेना?
सकाळ दुपार तेच तेच मानवतेवर बोलणं
.....मानवतासाठी काम करायला वेळ नाही म्हणे अरे यासाठी वेळृ नव्हे फक्त संवेदनशील मन हवय !
राष्ट्रासाठी म्हणे
....राष्ट्राला तुमच्या एकट्याची गरजच नाही
गरज आहे ती तुम्ही ज्या अनेकांपैकी एक आहात त्यांची
मग कशाला गळा फाडताय ,
...गर्जनारे बरसत नाहीत हा नियम आहे ,
आपणही तसेच का,
....राष्ट्राला तुम्ही खुप मोठ्ठा त्याग करावा  हे अभिप्रेत नाही फक्त खारीचा वाटा तरी  उचलावा हे अवश्य !!

बाजी ©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...