तुजविण ही प्रभातपुष्पे उमलता राहीली
छेडणारी द्वाड थंडी
आज बघ लाजली
स्पर्श तीरीच्या वाळुचाही जाणवु लागे तप्तसा
मि तरी एकटासा एकांत ही कल्लोळभरा
तुजवीण जिवनगाणी शब्दरुप राहीली
रचलेली अनुराग पद्यही शब्दशुन्य जाहली
रसिक से मन परी दाटली बहु अरसिकता
मि तरी एकटासा एकांतही कल्लोळभरा
तुजविण बघ मनसागर जाहला जीवहीनसा
वाळवंटीचा निवडुंग जणु वाटु लागला देह हा
बाग फुलांची फुललेली जरी कंटक लागे प्रियसा
मि तरी एकटासा एकांतही कल्लोळभरा
बाजी ©
No comments:
Post a Comment