Monday 10 April 2017

ये परतुनी .....भाग 6 अपघात

फार वेळ वाचल्याने एव्हाना विनुची चुळबुळ सुरु झाली ,
   त्याने मांडी घातलेली उलगडली पाय सरळ करत मागे टेकुन वाचु लागला

आयुष्य जगताना बर्याच चांगल्या-वाइट आंबट-गोड गोष्टी हृदयात दबतात
हृदय म्हणजे तरी का अनंत क्षमता असलेल गोडाऊन ?
नाही न मग ते देखील कधी तरी भरुन येतेच
त्याला देखील काही गोष्टीचा साठा वाढेल तसा भार वाटतोच
अशाप्रकारच ओझ कमी करायला हृदय त्याच्या जवळ असणार विश्वासु दुसर हृदय शोधते
जसे एक पेला खुप भरला असेल तर तो दुसर्या पेल्यात ओतला जातो तसेच
आणी हे हृदय
,............मित्रांशिवाय कोणाच असु शकेल ...हो ना !
माझ ही असेच होते मित्रांजवळ मि ही गोष्ट सांगितली ,
      पहीला विचार आला त्यांकडुन तो...
...तोच तो
       follow her !
का करु , योग्य नाही
असे एक मन सांगतं तर दुसरी कडे everything is fair in love and war असे सांगत जोपारुन नेते !
ह्या द्वंद्वात काही आठवडे घातले मि
शेवटी सुमित चिडला त्याने कॉलेज सुटल की त्याने मला गाडीवर बसवले आणी स्वतः हेल्मेट घालुन मला मागे बसवले
अन तो थेट तिच्याच ....तिच्याच मोपेड ला follow करु लागला
मि थंडीने काकडुन गेलेल्या मुलाप्रमाणे मागे बसलो होतो
  तोंड त्याच्या पाठीआड लपवत होतो ...धडधड वाढली होती हृदयात .

मि गच्च डोळे मिटले ...
..........ते करकचुन ब्रेक दाबलेला अवाज झाल्यावरच उघडले बघतो सिग्नल लागलेले होते ,
    सुमित काहीतरी बोलत होता मि लक्षच दिल नाही ,
कारण माझ मन तिचीच गाडी शोधत होत ,मि बावळटासारखा इकडेतिकडे बघू लागलो
   आणी
  .........ती दिसली
बाजुलाच तीन गाड्या सोडुन होती
    मि पाहत असतानाच आमची नजरा नजर झाली ...
         आणी तिने स्मित केले ,मि नजर चुकवली आणी गाडी सुरुकर म्हणत सुमितच्या पाठीवर जोरदार बुक्की मारली  ,
योग ,नियती,आणी प्रारब्ध हे एकमेकांशी triple bonded असतात
ती ने बघितल ,
  मि ही तिला वळुन पाहील
   सिग्नल सुटल गाडी सुरु होऊन निघाली
मि तीला bye म्हणावयास मागे वळु बघितले आणी हात हलवत होतो तोच मोठा अवाज झाला
काही कळायच्या आत तीची गाडी हवेत उसळुन जमिनीवर पडताना दिसली आणी .......
........
.
.
..मी...बेशुद्ध जाहलो !

हं पुढै वाचना रवी म्हणाला ,
अरे थांबतोस का ?
दोन मिनिट ते बघ फोन वाजतोय केव्हाचा बघ बर कोण आहे !
रवी जाऊन मोबाईल हातात घेतो आणी थोड्या अनिच्छेनेच म्हणतो ...
ये यार हे किरण्याचा फोन आहे ,
बघ काय म्हणतोय तो , विनु म्हणाला
हम्म्म् हैलो ,हा बोल ,
   आरे हो ना ,
  विसरलोच होतो मि
आलो आलो थांब दहा मिनीटात ......आरे हो रे त्याला ही घेऊन येतो  थांब थोडं .
काय रे काय झालं ? विनु म्हणाला
अरे ते ज्युनियरची टिम नाही का खो-खो ची तिच कोच रजेवर आहे आठ दिवस आणी त्यांची कोणत्यातरी स्पर्धेसाठी तयारी चालुय म्हणुन काही दिवस कोच म्हणुन आपल्याला जाव लागेल !
सरांचा आदेश आहे !
आळस देत विनु उठतो चला मग आता .....
...
.
.प्राक्टीस घेऊन आल्यावर हे दोघे हॉटेलमधे कोल्ड ड्रींक घेत बसलेले आसतात
अरे विनु ,तु बघितले ना ती जुनीयर मधील काय नाव बघ अं .....
  अकांक्षा  !     ........विनुने म्हटले .!
हं  कसली खेळती रे ती!!....... रवी आश्चर्याने म्हणाला!
हो ना ! एक दिवस नाव काढेल कॉलेजच ती ,तुला माहीतेय marathon तीच जिंकली होती !
खुप खुप talented  आहे ,  विनु थोडा उतावळा झाल्यासारखा बोलत होता
आणी तु !......रवीने भसकन विचारले !
   मि हरलो माझ्यामुळेच !  विनु उदास होत म्हणाला !

जाउ दे पण ,
  (विषय बदलत)
तु ओळखतोस वाटते तिला हो नां ! रवीने शंका व्यक्त केली
का रे ? तुला का अस वाटल हा ! विनु गोंधळला

कारण काल तु तिच्या जवळच गप्पा मारत बसला होतास मि ग्राउंडवर आलो डायरी घेऊन तेव्हा ,
विनुचा चेहरा कावरा बावरा झाला होता ,चोरी पडल्यावर जसे भाव असायचे तेच तेच भाव होते ,
तस काही नाहीय , विनु सावरण्याचा प्रयत्न करत !
मग कसय ! तुला नाव कस माहीती रै तिच !आणी एक सांग
तु कधीपासुन मुलींसोबत गप्पा मारु लागलास  रे ,आवडत नवत ना तुला !
माझ्यापासुन लपवु नकोस ,
.........रवी त्याच्यावर चिडलाच जवळजवळ !
परंतु विनु एक शब्द बोलत नवता
    रवी त्याला हलवु हलवु विचारत होता !
आरे सांग ना !
परंतु विनु गप्पच होता !
आता मात्र रवी चिडला ....जा नको सांगु हिच का जीवासजीव देणारी मैत्री आपली !
असे शब्द विनु ऐकतो आणी ताडकन उठुन सरळ रुमकडे निघतो ,
रवी हा प्रकार पाहतो तो तरीही विचारतो
आरे कुठे निघालास ?
चल रुमवर सांगतो सगळ तुला !
   आणी तो घरी जाण्यास निघतो....



No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...