Sunday 2 April 2017

महाराजांच्या मृत्युसंबधी

बखरी आणी महाराजांचा मृत्युसंबधी माहीती
महाराजांच्या मृत्यु समयी हजर सरदार ,हुजरे यांबाबत माहीती बखरी देतात
तर आता
सभासद बखरी प्रमाणे पाहु कोण कोण हजर होते,
कारभारी मंडल

.     निळोपंत मोरो पेशवे
   प्रल्हादपंत जनार्दनपंतांचे चिरंजीव
रामचंद्र निळकंठ
रावजी सोमनाथ
आबाजी महादेव
बाळाजी आवजी चिटणीस
जोतीराव
तर
सरदार लोक .
     हिरोजी फर्जंद
      बाजी कदम
बाबाजी घाटगे
मुधोजी सरखवास
सुर्याजी मालुसरे
महादजी नाईक पानसंबळ

ही खाशी माणसे
यात अण्णाजी दत्तो सुरनीस आणी मोरोपंत पेशव्यांच नाव कुठेच नाही कारण यावेळी ही मंडळी गडावर हजरच नव्हती
मग मारणार कसे
आणी सर्व बखरी हेच सांगतात कि महाराज ज्वराने निवर्तले !
मराठ्यांची बखर सांगते,
  गुडघी ह्या आजाराने महाराज पुढे ज्वरास बळी पडुन निवर्तले
तर
   ९१कलमी बखर
   याउपरी स्वामीस नवज्वर जाहला शके १६०२ रौद्रनाम संवत्सरे चैत्र मासी पौर्णिमा दो प्रहरी  राजे स्वामीस कैलासवास जाहला
सभासद बखर
राजास व्यथा ज्वराची जाहली राजा पुण्यश्लोक कालज्ञान जाणे....
येणे प्रमाणे बखरींचा तपशील

बखरी ची विश्वासार्हता कमी असली तरी अगदीच टाकाऊ नसतात !!

बाजी©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...