Thursday 29 June 2017

ये परतुनी भाग आठवा

अवघड होता ग....
.....तो क्षण   
ज्यावेळी नातं तुटलं हा विचार मनात आला !
    अचानक जोरदार वारा गरगर सुन्नननननन अवाज करत मस्तिष्कात फिरु लागला
हातातील रक्तवाहीन्यांत भुकंप उद्रेक पावत होता
त्याच्या भयानक लहरींनी हात पाय थरथर  कापत होते.....
     शरिराची उष्णता प्रलयकाळा सारखी अंगास तापवु लागली...
आत ही बाहेरही ,
सगळं रानं पेटलं होतं  मनामधे च नव्हे तर बाहेर ही
शरिरातील सगळी शक्ती अकल्पीत शुन्यात विरली
,कळेचना
हे सर्व भावना वेग अंतकरणाच्या पृष्ठभागाला धडाधड धक्के देऊ लागले
आणी भावनांच्या ज्वालामुखी चा उद्रेक कंठातुन आणी डोळ्यातुन बाहेर येऊ लागला .
मि हमसुन हमसुन रडलो ,
       तु सहज म्हटलीस ,
तुला मिळेल दुसरी माझ्याहुन छान अशी ,परंतु

.... प्रत्येक खोल जखम काळाने बरी जरी होत असली तरी
  व्रण जाचत राहतोच
  आयुष्यभरासाठी ...
तो सोबतच राहतो ,
       दहशत बसवायला की पुन्हा ही चुक करु नको ,
हे मन ,
    ह्या जागेवर झालेली जखम सहन करायला समर्थ नाहीय
         आणी पुन्हा कुणावर प्रेम करायला हिम्मत ही करणार नाहीय !
कारण
   भुतकाळाता झालेले आघात !
      ह्या भयानक आघाताने ते अगदीच दुर्बल झालयं  
आघात सहन करुन शिणलेलं वरुन भक्कम वाटत असेलही परंतु
आतुन
    कमकुवतं !
जुन्या किल्याच्या तटाप्रमाणे !
        या विचारात मि मुर्छित कसा झालो कळलंच नाही !

बाजी
जीवन अर्घ्य
ये परतुनी भाग आठवा



Tuesday 27 June 2017

आयुष्य माझे

आयुष्य ....
,.,,छोटच असत  त्याला मोठं बनवतात नाती ..
मनाने मनाशी मनापासुन गुंफलेली ,जपलेली आणी वाढवलेली.
अपेक्षा खुप असतात ,
खरेतर त्या कधीही संपत नसतात
आयुष्यात आपल्याला खुप सारं हवं असतं
पण मिळालेल्या गोष्टींवर,माणसावर प्रेम करण यातच खर सामाधान असतं
आयुष्य आभाळासारख असत हे खरय परंतु ते कधी उजेडात छान दिसत ही नाही
काळोखाने झाकोळल्यावर
      जेव्हा चांदण्या त्यास सोबत करतात तेव्हाच दिसते ना
आयुष्य ही असचं आहे .
   वर वर पाहीलं आजुबाजुला असते एकरंगी पोकळी
बस्सस
परंतु ह्याच आयुष्याच्या गडद अंतकरणात एकदा
डोकावुन बघ
निरखुन बघा
सापडते अनंत नाते रूपी
मित्ररुपी तार्यांची सोबत ,
जी चमकवुन टाकते ,धुंदवुन टाकते ,रंगवुन टाकते आयुष्याला
प्रत्येक तार्याचा पैलु ही वेगळाच ,माणसासारखा
प्रत्येक तारकासमुहाचा आकार वेगळा नात्यांसारखा
मग कळत हव्या असलेल्या न मिळाल्या तरी चालेल परंतु
   यांची सोबत नसेल तर ?
    नशिबी काय
काळोख ? एकटेपणा ?
मग वाटत मनाला हव ते न मिळाले तरी चालेल आहे ते गमावले तर हा सौदा घाट्याचा आहे
आणी मग माणुस काही गोष्टी मिळो न मिळो आयुष्य जगु लागतो ........
..........माणसासारखं

बाजी©
omkarpandav.blogspot.com

Monday 26 June 2017

तु जातेस

तु जातेस ! तु जातेस निघुन ,
हात हातातील तसाच सोडुन
वाट सोबतीची मधेच मोडुन
परंतु मि ?
मि तसाच राहतो  तुझ्या मागे
  उभा  !
   शांतपणे ,
      निर्विकार पणे
पाहत तुझ्या पाठमोर्या आकृती कडे !
आशा कसलीही नसते मनात
ना कृसले ही थैमान असते
तु वळुन बघावं की परतुन माझ्या मिठीत याव असली काहीही आशा नसते !
तुझ्या मनातील भाव माहीती असुन ही मि पाहत असतो
निरखित असतो  ,
एकटक

एकटक पाहतो ,
  कसलीही तमा नसते
   की कशाचीही क्षिती नसते
होऊ लागलेल्या अंधाराची ,
रिमझिमणार्या पावसाची ,
सळसळणार्या पानांची
कि नाचणार्या वीजांची
नजर असते
निर्जीव
   स्थिर
अगदी पर्वतासारखी ,
निरखित असते फक्त तुला
फक्त तुला ,
तु कृधीच सोडुन मला एकटी नसतेस ,
मि तिथेच असतो ,
अंगास स्पर्शणारा थंड वारा बनुन ,
केसांतुन ओघळणारा पाण्याचा थेंब बनुन
सुखावणारा मातीचा गंध बनुन
आणी
त्या सरशी येणारा तुझ्या अंगावरील काटा बनुन !
मि तीथेच असतो तुझ्या ........
....मागे !

बाजी©

Friday 23 June 2017

निषेध

पाकचा निषेध !
  गेले साठ सत्तर वर्ष आम्ही फक्त निषेधच करतो !
सैनिक मरतात ,आमची कामचलाऊ देशभक्ती  दोन दिवस आठवण ठेवतो पुन्हा आपल जस आहे तसच होतं
कोणाला घेण देण राहत नाही
आम्ही कधी पाकची असहकार करा ,शत्रुराष्ट्र घोषीत करा अशा मागणीचे विराट क्रांती मोर्चे कधीच काढत नाही
काढले तरी ते कोण्या पार्टीचे स्टंट असतात ,तरी ते काही विराट सोडा भव्य पण नसतात कारण आम्हाला शहीदांसाठी ,देशासाठी वेळ नसतो
आम्हाला कामे असतात महत्वाची
आमचा धंदा ,नोकरी मुलबाळ,बायको ,गर्लफ्रेंड ,शाळाकालेज यामधुन देश या गौणमात्र गोष्टीसाठी आणी सैनिकासारख्या फक्त सहानुभुतीच्या माणसासाठी कुठे वेळ असतो ,
आमच्या जाती साठी आम्ही लाखो ने जमतो ,
क्रिकेट साठी रस्त्यावर भांडतो ,
धर्मासाठी एकमेकांचे जीव घेतो परंतु कधी एकदा तरी
देशहिताच्या मागणी साठी एकत्र येउन सरकारवर दबाव आणतो का ?
तर नाही
भारताचे तुकडे पडले त्याला कारण आपणच !
कारण अगदी निसर्गसिद्ध नालायक नागरिक ,
आम्ही शेताच्या बांधावरुन एकमेकाचे गळे चिरतो परंतु हिच गोष्ट जेव्हा दुसर्या देशासोबतच्या बांधाची असते तेव्हा आम्हाला अहिंसेचे पाठ आठवतात !
कारण तो मुद्दा वैयक्तिक स्वार्थाचा नसतो म्हणुन
पण हिच गोष्ट आम्ही बांधावर ग्राह्य धरत नाही कारण वैयक्तिक स्वार्थ !
देशभक्ती म्हणजे क्रिकेट नसते ,सैनिक शहीद झाल्यावर दोन दिवस पोस्टने नसते किंवा पंधरा आगस्ट ला फक्त झेंडावंदन करणेही नसते
हा देशप्रेमाचा हे सर्व एक भाग असेल
पण देशभक्ती कशात असते ?
देशाचा प्रत्येक प्रश्न माझ्या घरातला माझा प्रश्न वाटायलाच हवा
देशाचा शत्रु म्हणजे चीन सारखे देश मोठे होतील याला कमीत कमी हातभार लावणे
आपली संस्कृती ,आपल्या चालीरिती आपल्याला कधी इतरांपेक्षा  गौण वाटु नयेत
ऐतीहासिक वारसा सांस्कृतिक वारसा आपला इतीहास या विषयी अभिमानच बाळगणे
जग कितीही सुंदर असो माझा देश कितीही गरीब असो परंतु तोच श्रेष्ठ ही भावना
माझी जात धर्म देशाहुन मोठा वाटु नये
स्वार्थासाठी कर कर्ज बुडवुन देशाची हानी न करणे यासारखी असंख्य गोष्टी आहे विस्तारभयास्तव  थांबवितो !

जय हिंद !
जय भारती !

बाजी©
omkapandav.blogspot.com

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...