पाकचा निषेध !
गेले साठ सत्तर वर्ष आम्ही फक्त निषेधच करतो !
सैनिक मरतात ,आमची कामचलाऊ देशभक्ती दोन दिवस आठवण ठेवतो पुन्हा आपल जस आहे तसच होतं
कोणाला घेण देण राहत नाही
आम्ही कधी पाकची असहकार करा ,शत्रुराष्ट्र घोषीत करा अशा मागणीचे विराट क्रांती मोर्चे कधीच काढत नाही
काढले तरी ते कोण्या पार्टीचे स्टंट असतात ,तरी ते काही विराट सोडा भव्य पण नसतात कारण आम्हाला शहीदांसाठी ,देशासाठी वेळ नसतो
आम्हाला कामे असतात महत्वाची
आमचा धंदा ,नोकरी मुलबाळ,बायको ,गर्लफ्रेंड ,शाळाकालेज यामधुन देश या गौणमात्र गोष्टीसाठी आणी सैनिकासारख्या फक्त सहानुभुतीच्या माणसासाठी कुठे वेळ असतो ,
आमच्या जाती साठी आम्ही लाखो ने जमतो ,
क्रिकेट साठी रस्त्यावर भांडतो ,
धर्मासाठी एकमेकांचे जीव घेतो परंतु कधी एकदा तरी
देशहिताच्या मागणी साठी एकत्र येउन सरकारवर दबाव आणतो का ?
तर नाही
भारताचे तुकडे पडले त्याला कारण आपणच !
कारण अगदी निसर्गसिद्ध नालायक नागरिक ,
आम्ही शेताच्या बांधावरुन एकमेकाचे गळे चिरतो परंतु हिच गोष्ट जेव्हा दुसर्या देशासोबतच्या बांधाची असते तेव्हा आम्हाला अहिंसेचे पाठ आठवतात !
कारण तो मुद्दा वैयक्तिक स्वार्थाचा नसतो म्हणुन
पण हिच गोष्ट आम्ही बांधावर ग्राह्य धरत नाही कारण वैयक्तिक स्वार्थ !
देशभक्ती म्हणजे क्रिकेट नसते ,सैनिक शहीद झाल्यावर दोन दिवस पोस्टने नसते किंवा पंधरा आगस्ट ला फक्त झेंडावंदन करणेही नसते
हा देशप्रेमाचा हे सर्व एक भाग असेल
पण देशभक्ती कशात असते ?
देशाचा प्रत्येक प्रश्न माझ्या घरातला माझा प्रश्न वाटायलाच हवा
देशाचा शत्रु म्हणजे चीन सारखे देश मोठे होतील याला कमीत कमी हातभार लावणे
आपली संस्कृती ,आपल्या चालीरिती आपल्याला कधी इतरांपेक्षा गौण वाटु नयेत
ऐतीहासिक वारसा सांस्कृतिक वारसा आपला इतीहास या विषयी अभिमानच बाळगणे
जग कितीही सुंदर असो माझा देश कितीही गरीब असो परंतु तोच श्रेष्ठ ही भावना
माझी जात धर्म देशाहुन मोठा वाटु नये
स्वार्थासाठी कर कर्ज बुडवुन देशाची हानी न करणे यासारखी असंख्य गोष्टी आहे विस्तारभयास्तव थांबवितो !
जय हिंद !
जय भारती !
बाजी©
omkapandav.blogspot.com
No comments:
Post a Comment