Saturday, 26 August 2017

एक असंग सहवास

सुंदर खळखळणार्या नदी काठी खुप पक्षी येत असतात...
    पहीले तर ते अनोळखी असतात आगंतुकासारखेच ...
अंतर असते त्यात ...आपल्यात...
      हृदयांत मनात विचारात ....अनभिज्ञ पुर्णतः
         परंतु काळा ने हळुहळु कसलीशी बॉंडीग बनते
त्यांच्यात आपल्यात...
रोज तीच नदी तीच जागा तेच पाणी हे सगळ असल तरी मन मात्र त्या पक्ष्यांनाच शोधत असतं..
वास्तविक त्यांची आपली कसलीही ओळख नसते,
कसले संभाषण नसते तरीही ,
       एक धागा अज्ञातपणे बांधला गेलेला असतो ....
हृदयाचा आपल्या ....त्यांच्याशी..
कदाचित त्याना कल्पना नसते ..ते गुंग असतात आपल्याच धुंदीत ....
आणी
अचानक एक दिवस ते पक्षी तो थवा निघुन जातो .....
   आणी
आपण मात्र ,
आपली नजर मात्र शोधत असते
....त्यांच्या पाऊलखुणा.....
कसली भावनेची नाळ असते ही ?

बाजी©
       

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...