Sunday 31 December 2017

पुस्तके :जुन्या मित्राची पुन्हा भेट.

पुस्तके ..जुना मित्राची पुन्हा भेट !

या विषयावर कविता करावी तरी उत्तमच होते परंतु काही गोष्टी अल्प शब्दात मांडाव्या इतक्या लवचिक खास नसतात .
डिसेंबर उजाडला की आंग्ल नववर्षाची चाहुल लागते,मनाला आपोआप कसलीशी हुरहुर लागते ,
गत वर्षातील आठवणींचे पट हळुहळु ओळीने डोळ्यासमोर तरळु लागतात
या आठवणींच्या निमित्ताने एकएक माणसे आठवु लागतात,आठवतात काही गतवर्षीस केलेले संकल्प ,ते पुर्णत्वास नेण्यासाठी केलेले प्रयत्न .
नविन संकल्प मनी बांधण्यासाठी वेळ मिळतो स्वतःच्या मनाच्या कानाकोपर्यात फिरण्यासाठी ,स्वतःच्याच मालकीच्या संपत्तीच मुल्यमापन करण्यासाठी ,
मन काय आहे हे भौतिकतेच्या पातळीवर जरी ज्ञात नसले तरी ,केवळ कल्पना करुन  तरी त्या मनाच्या भुतकाळ नामक कप्यात साठविलेल्या अनेक आठवणी ,घटना आणी सवयी यांच मुल्यमापन करु लागतो आणी ते ही एका वेगळ्या दृष्टीकोणातुन ,
  अशाचप्रकारांती आज एका दुरावलेल्या मित्राशी मैत्री पुन्हा वाढवावी
असा संकल्प मनी धरिला ,
दुरावलेला म्हणजे इयत्ता दहावी पर्यंत जी  मित्र म्हणुन होती ती ही पुस्तके फक्त ,
त्यांच्यासोबत बालपण संपुन किशोरावस्थेत कधी पोचलो याचा गंधच  लागला नाही ,खुप काही आठवणी या पुस्तकांसोबत आहेत
काही गोष्टींप्रती प्रेम त्यासाठी विरोध झाल्यावर वाढते तसच माझं झालं .
मी इ.पाचवी ते दहावी गावी योग्य शिक्षणाभावी  आत्या-मामा कडे पाथर्डीस होतो .
या पुस्तकासोबतच नातं वाढण्यास आमच्या आत्याबाई पुर्णतः कारणीभुत आहेत तसं त्याना शालाबाह्य पुस्तकवाचन जमत नसे  ,त्यांच्या या वागण्यास कारणही योग्य होते ,आजही ग्रंथालयाची बरीच पुस्तके माळ्यावर तेव्हा फेकली ती अजुन आहेत ,ती फेकली कारण माझ अभ्यासाकडे होत असलेल दुर्लक्ष ! या गोष्टीमुळे मी अभ्यास आणी वाचन
दोन्ही गोष्टींचा ताळमेळ जमविण्यास शिकलो ,
नंतर पुस्तकात पुस्तक घालुन वाचावयाचो ,ही गोष्ट आत्यास माहीती होती  हे मला आता गेल्यावर त्यानीच सांगितली ,
ती माळ्यावरची पुस्तके मी पुन्हा पाहीली आणी त्या जीर्ण पानांवरुन हात फिरवितानि मला जुना मित्र सापडल्याचा आनंद झाला ,
लहानपणी काही गोष्टीच वेड वेगळच असते नं ,काही कळत नसताना ही
मी गलेलठ्ठ कादंबर्या आणी पचावयास अवघड अश्या विचारी लेखकास वाचले ,त्यांच्याशी  मैत्री केली ,
  सुरुवात साने गुरुजींपासुन ते सावरकर -होमर पर्यंत .
आणी पाऊलखुणा ,पानीपत,मृत्युंजय पासुन मराठी, मुसलमानी रियासत  पर्यंत इ.नववीपर्यंत
वाचले ,
आणी दहावी वर्ष शनी च्या साडेसातीस घेऊन आले,ह्यास मी शापीत म्हणेन कारण हे वर्ष सुरु झाले आणी माझा मित्र कुठेतरी मजपासुन दुरावला ,
स्पर्धेच्या गर्दीत हरवला , तसा तो pdf रुपात कायम सोबत होता परंतु
या त्याच्या नव्या रुपात त्यास स्विकारण्यास त्याची सवय होण्यास वेळ गेला
आता पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षा त्याची जाणीव जास्त तीव्र झाली कुठेतरी वाटलं ,परतावे स्वतःकडे स्वतःच्या नैसर्गिक स्वभावाकडे
म्हणुन नववर्षाचा संकल्प मनी बांधिला ,हा मित्र पुन्हा जवळ केला .

बाजी©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...