Saturday 28 December 2019

शत्रुस मारुनी दहा दिशास

शत्रुस मारुनी तू दहा दिशास  जाळूनी 
रक्त सडा शिंपूनी अन मरणास जिंकूनी
लंका हजारश्या तु लांघ  झेप घेऊनी
चाल कर तू चाल कर तू मारुती होऊनी

भिती भगव्याची ठास लंकेस जाळूनी
दुर्योधन फाड तृष्णा पुरव रक्त प्राशूनी
समरात भयंकर बिभत्सपणे नाचूनी
उठ आर्यवीरा कर चाल शंख फुंकूनी

दिव्य आणी भव्यता मनगटात धारुनी
रक्त चंदनाचे श्रेष्ठ दान भू स अर्पूनी
निःपात कर निःपात कर दुर्जनाचां आज तु
मुक्त कर तु मायभूस धर्मयुद्ध छेडूनी 

baaji©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...