अव्यक्त जड भावना जाहल्या
कसे मन सावरावे
तुजप्रती मन ओढावते तव
कसे मि सावरावे
भावना व्यतीत करण्या भितोहा
सांग कसे मन सावरावे
बद्ध आठवणी अनेका गुंफुनी वळवितो सुतासम तरी का निसटावे हे मन
प्रिये सांग कसे सावरावे !
मानसी एकटा कसले ते
म्या शब्द असे जुळवावे
तरी आकस्मिक तुज आठवता ते
कसे ग विखरावे
भावनासी माझीया कसे शब्दरुपे वळवावे
सांग प्रिये माझीया मनाला मि कसे सावरावे !
तव आठवणी स्मरणपटलाशी असाव्या मम स्मित हास्य मुखाच्या कारणी बनाव्या
तु जरी असशील दुर मज सोडुनी
तरी तु मज आठवावे
येतील कधी तव नयनी न असवांसी साठवावे
मि सावरेन कदाचित् या क्षणीही
परी तु भावनास्तब्ध रहावे
तुजसाठी म्हणे हृदय हे
आधी स्वतःसी सावरावे !
आधी स्वतःसी सावरावे !
omkar ©
No comments:
Post a Comment