Sunday 7 February 2016

मित्र नसे गुलाबा वेगळे

मित्र आणी गुलाब यांत बरेच साम्य आहे ना!
हो खरं की !
इश्वराने गुलाबाला भोवतालीचे वातावरण सुंदर करण्यासाठी बनवावे तसेच
मित्राना देखील आपले भोवताली आनंदाचे वलय निर्माण करायला बनवले.
गुलाब आपल्या रंगाने मन प्रफ्फुल्लित करत असेल तर मित्र ही आपल्या स्वभाव रंगाने आपले मन बहरतात
गुलाबाला खाली काटे असतात  ते कठीण प्रसंगी स्वतःचे संरक्षण व्हावे याकरिता !
तसेच खरे मित्र ही संकटकाळी खंबीर असतात.
गुलाब आपल्या सुगंधाने वातावरणास बहर आणतो तसेच मित्र ही आपल्या दुःखी आयुष्यात सुगंधच पसरविण्यासाठी धडपडतात नाही का!

प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब लागतो तर ते प्रेम व्यक्त करताना धीर देणारा हा मित्र असतो !

HAPPY ROSE DAY TO MY LOVELY FRIENDS
बाजीराव पांडव ©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...