हे व्रत घेतले धर्मरक्षाणाचे न सांडु कधी
जाईल जरी नश्वर देह हा मागे न हटेन कधी
दिव्या भारताच्या इतीहासाचे दिव्य आम्ही अभिमानी
अभिमानाने फिरुन वनाने
गाऊ सदा विराणी
राणाप्रताप शिवप्रभु बाजी लढले थोर याचीसाठी
रक्त सांडुनी भांडले मावळे पानीपत वा हलदीघाटी
अजन्म कधीही शतजन्म कधीही न विसरती ते बलीदानी
अभिमानाने फिरुन वनाने गाऊ सदा विराणी
आता वेळ आपली गड्यानो
व्हा सज्ज परजुनी समशेरी
हा देश आपला साचा
व्हा सिद्ध तया रक्षणा ला
स्वातंत्र्य रक्षणार्थ मारेन अथवा मरिन
जरी वेळ पडेल वाकडी!
मग अभिमानानी
फिरुन वनाने गाईन कुणी विराणी
बाजीराव©
१० फेब्रुवारी २०१६
No comments:
Post a Comment