Friday, 5 February 2016

सुचल काही १

सुचत नसलं काही लिहायला तरी कधीकधी लिहावस वाटत पण काय लिहावं हा प्रश्न उरतो तेवा सहजिकच माणुस स्वतःच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करतो !
आयुष्यात घडणाऱ्या किंवा घडलेल्या गोष्टींकडे  बघण्याचा आपल एक दृष्टीकोन असतो
तो काही काळाकरिता बदलतो !
नक्कीच कारण इथे आपली शोधकता जागृत असते.
अस म्हणतात काळाला अन क्षणांना माग टक्कल असते अन पुढुन केस
जर ते वेळीच पकडले तरच आठवणींच्या कप्यात राहतात
नेमक तेच घडतं अशा वेळी
दिवसभरात वा आजवरच्या आयुष्यात भिन्न व्यक्ती भिन्न प्रसंगाना सामोरे जातात त्यांचे व्यक्तीमत्व बनायला ते प्रसंग कारणीभूत असतात!
तेवा एखाद्याच्या व्यक्तीमत्वास नावे ठेवण्याचा आपल्याला खचितच अधिकार नाही
तशीच ही गोष्टआपल्यालाही लागु पडते
जसे आजवरचे आयुष्य तशीच आपली मते तसेच आपले विचार  !
   म्हणुनच की काय संस्कार लहानपणी करतात !
मोठे झाल्यावर घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो

एकृच घटना एका कथेत जशी प्रत्येक साक्षिदाराने वेगळी सांगितली होती !
अगदी तसच वेगळ्या लोकांचं एका गोष्टींवर वेगळ मत असतं !
आपण त्यावर आपलं मत निश्चितच लादु शकत नाही !

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...