निशब्दता ही गुढता का भावना न समजल्या!
ही शांतता का एकांतता भास कसा न उमगला
तु अशी न दिसशी किवा
की अरमनीयता भासे नभा
का की कळेच ना!
प्रयत्नतः मी अति पाहता विसरण्या न जमले
धडधड यावे पुन्हापुन्हा कीवा तट्टांसम उसळावे
विरक्त ते अति सख्त ते का
न मन न विसरावे
का की कळेच ना!
एकतत्वता अशी निवडीतता मग चंचलता का होते मना
सप्तसुर हे भासे असे विरुनी बने अद्वैतता
सांग मना कसली ही छंदीष्ठता
हिरण्यासम ही तप्तता की सोमा सम ही शांतता
का की कळेच ना !
बाजीराव©
No comments:
Post a Comment