Friday 10 April 2020

ये अशी माळून रातीला

ये अशी माळून रातीला तुझीया कुंतली
भृंग होऊनी उडू दे अत्तराचे भोवती
गुंग थोडे दंगही बेधुंद होऊ सोबती
वृक्षराजी चंद्रताऱ्या सोबती या भूतली

जे मनाच्या कोंदणी काढून घेऊ ताम्हणी
स्वप्न दोघे रंगवू लावून त्याला झालरी
ये अशी आलिंगनी होऊन वेडी वल्लरी
एक मी हो एक तू हो चंद्र मी तू चांदणी!

baaji©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...