गडांवरुनी इतिहास बोलतो , रण मर्दानी जातीचा
तो वीर एक जन्मला शिवाजी , वाघ मराठी मातीचा ||धृ||
भारत भू च्या उरावरी क्रूर,नाचत होता म्लेंछ कसा
लचके तोडून विद्ध जाहला,देशधर्म तो कधी असा
धूळ झटकावून पुर्व दिशेने,विजय रंग तो उधळविला
तारण्यास बहू हिंदू जना,अवतार शिवाने प्रकटविला ||1||
आग पेटली वणवा भडकला होम पेटे स्वातंत्र्याचा
तो वीर एक जन्मला शिवाजी , वाघ मराठी मातीचा
तलवार भवानी सळसळूनी,दुष्टा भिडला सह्याद्री
पोलाद मातीचे अलग करुनी, मजबुत बनलेल्या छाती
तट्टस्वार ठठ्ठाच्या खड्गे ,दुष्ट म्लेंछ तो मारियला
रणरंग मांडले मोठे जंगी,शौर्यसागरा खवळविला
हर महादेव हर महादेव हर घोष उडाला वीरगतीचा
तो वीर एक जन्मला शिवाजी , वाघ मराठी मातीचा
No comments:
Post a Comment