भाळी चंद्रकोर लेवूनी,साज चढवूनी
साडी नेसूनी, हिरवा किन्खाप
राजसी ...
गुलाबी कळी,गाली ची खळी,
जशी पाकळी ,बहुत सुकुमार
मृगनयनी
चंचला भारी,संयमारि
चित्त ती हारी,सहज चालीत
रमणी पाहते
नेटकी कशी ,नजर तीची कशी
चालवी जशी,नयनबाण
घायाळ
जखम ती काय ,भरावी हाय ,
काय उपाय ,राजसी आता
तुझा जो वार ,
दिलावर मार ,पडलो मी गार,
झालो शिकार,शिकारी आता
बाजी©
No comments:
Post a Comment