Friday, 17 April 2020

चुंबता ओठास गाली

चुंबता ओठास गाली सांग लाली कशी आली
हुंगता रात्री  दवांची सांग वर्षा कशी झाली

स्राव ओठी वाहिलेले जीभ तृषार्त वल्लरी
नेत्र मद्या प्राशले मी शुद्ध केव्हा तुझी गेली

स्पर्शिता अंगास तुझ्या रोम रोमांचून गेली
पौर्णिमेला छेडले अन तृतिया लाजुनी गेली

हात हाती घट्ट राती आज आलिंगनी आली
अन पहाटे रात वेडी सांग झोपी कशी गेली

नाहलो मी चिंब तू का सांग ओली कशी झाली
अंत उत्ताप प्रणयी माझ्यात तू वाहुनी गेली 

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...