स्वःर्लोकीची प्रेमदेवता जणु भुतली अवतरते
जन्म देऊनी प्रतीरुपाला
ती कशी कुरवाळीत बसते!
पसरले स्मितमंद मुखावरी
बाल्यमुखासी देखियता
हर्षे चुंबने वर्षिती ती
तव नाजुक नयनासी देखियता
नव नृयनी त्या काय असावे
कि दिसावे अतिरम्ये निरखितता
असेल बालक कृष्णासम
तर दिसेल विश्वरुप तिजला !
बालक असते कृष्णरुप जरी
मातेला उपमा काय असे !
उपमाच नसे या नश्वर जगती
जी माते सम ही श्रेष्ठ असे !
पाहुनी मातृप्रेम तिचे
गहीवरलो क्षणभर मी मनी
वदलो आठवुनी माता माझी
जननी ती जननी
न जननी लाभता
काय उरे या भुवनी !
बाजी©
omkarpandav.blogspot.com