Thursday 28 January 2016

पानीपत

सगळ संपल असेल यावेळेपर्यंत युद्ध !
उरला असेल मांसाचा चिखल
वाहत असतील रक्ताचे पाट
घुमत असतील किंकाळ्या
तो यम सुद्धा कळवळला असेल
ते विराना सोबत नेताना.
म्हणत असतील जरी आम्ही मेलो तरी आमच्या एकाएका थेंबांपासुन
बनेल उद्याचा हिंदुस्तानी सैनिक
अन राखेल देशाची मान
कणखर
अगदी हिमालयासारखी!
बाजीराव©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...