Saturday 31 August 2019

भुषण छंद पद्यानुवाद

एक कहै कलपदुम है इमिं पूरत है सबकी चित चाहै ।
एक कहैं अवतार मनोज को यों तन मै अति सुंदरता है ।
भूषन एक कहैं महि इंदु यो राज बिराजत बाढयो महा है ।
एक कहैं नरसिंह है संगर एक कहैं नरासिंह सिवा है ॥ १
*पद्यानुवाद*
हा जणु कल्पलता शिव राजन सर्व करी जनकामन  पुर्ती
तो अवतारच श्रीहरि चा मन भावन मोहक सुंदर मुर्ती
चंद्रच तो जणु  काय कलानुरुपे वर कायम वाढत जातो
हा शिव मारत शत्रु  रणी मग जो वधुनी नर  सिंहच  होतो

२) प्रेतिनी पिसाचरु निसाचर निसाचरी हू, मिलि मिलि आपुसमे गावत बधाई है 
भैरों भूतप्रेत भूरि भूधर भयंकर से , जुत्थ जुत्थ जांगिनी जमाति जुरि आई है
किलकि किलकि के कुतूहल करति काली ,डिम डिम डमरू दिगंबर बजाई है
सिवा पूछें ' समाजु आजु कहाँ चली, काहू पै सिवा नरेस भ्रकुटी चढाई है । । ३ । ।
हडळी अन निशाचर  पिशाच पिशाची ही ,
पुन्हा पुन्हा आनंदाने गातं गर्जत आहे

भैरव भुतप्रेत हे बलवान महाकाय,
झुंडी झुंडी सागरासम ही जमतं आहे

किल किल किल किल गर्जते कालिभवानी,
डम डम डमरु हे रुद्र  वाजवताहे

गिरीजा  विचारे देवा गणसेना चाले कोठे,
म्हणे शिवराय भृकुटी चढवताहे

Monday 26 August 2019

काटा रुतलेला राहीला

वृत्त-देवप्रिया

संपलेले सर्व  काटा रुतलेला राहिला
तोडले मी बंध धागा गुंफलेला राहिला

चालला हा चंद्र कोठे मैफिलीला सोडुनी
एक प्याला आठवांचा ओतलेला राहिला

वाटले हे  सागरा रे मोकळे व्हावे जरा
तो रिते होता मनी नाला तुंबलेला राहीला

तासताना अंग सारे झाड झाले बोडखे
गंध गाभ्यातील तैसा  छाटलेला राहीला

बाण शंकांचे किती मी रुतलेले काढले
एक अंती बाण का हा रुतलेला राहिला

जीर्ण होता बंगला जो गावठाणी पाडला
का चुना चिर्यामधे तो जोडलेला राहिला

कूट प्रश्नांची किती मी सोडवावी उत्तरे
प्रश्न अर्धा एकची हा सोडलेला राहिला

चालताना होत नाही भास आता

चालताना होत नाही भास आता
पाहताना रोखतो ना श्वास आता

सोडताना हात येथे  हृदयाला
वाटतोना कोणताही त्रास आता

तोडताना पाहतो मी रोज येथे
येत नाही या फुलाना वास आता

सांजवेळी येत होतो ती दिसेना
लागली का या मनाला आस आता

छत्रपती स्तुती घनाक्षरी

उग्रवीर क्रुद्धमहा तांडवात रुद्रजणू,
चपलचपलेहून प्रचंड शूल जणू

घनन् घनघोर चतुरंग भूप छत्रपती
खड्ग विखंडकारी म्लेंछ अरि सह्यपती

मेरुहुन उंच गढ उंच गढकोट पती
श्रीमंत श्री महादानी पुण्यशील श्रीपती

इंद्रही न चंद्रही  प्रभावशाली सुर्य जणू
राजा शिवछत्रपती वैराग्यनृप जणू

हारलो होतौ

वृत्त मंजुघोषा
डाव येथे खेळताना हारलो होतो
मी सुखाला शोधताना हारलो होतो

साथ नाही चालतो मी एकटा वेडा
श्वास येथे चालताना हारलो होतो

उत्तरे मी शोधलेली सर्वची येथे
शांत येथे झोपताना हारलो होतो

युद्ध मोठे भावनांनी, छेडले जेव्हा
आसवे मी रोखताना, हारलो होतो

काय माझे शब्द मजला पारखे झाले
भाव येथे बोलताना ,हारलो होतो

Friday 23 August 2019

दाटून आलेले भावघन
आत स्वत्व हरवलेले मन होते
निर्धारान वळणार्या मुठीत बंदीस्त मनातील वादळ होते

ध्वस्त वादळांनी केले मग
स्वतःच वादळ बनलो होतो
उसनं रुप सोडुन आता
स्वतःला ओळखुन गेलौ होतो

ओळखं अशी जुनी पण
मनाने गुंता केला होता
सोडवणे सोडुन निरपयोगी
विचाराने फेकून दिला होता

बाजी

Sunday 4 August 2019

शिवसैन्य

चाले वीर दणदण बोले शिव हर हर घुमे वारा भिर भिर  शिवसैन्य चालते
घुमत घुमत घोर नगारे रणशिंग घोर लढण्यास अधीर शिवसैन्य चालते
यम यम भिववुन पळते यवनसेना मारण्यास क्रुद्धमहा शिवसैन्य चालते
रक्त रक्त लोटलेले महा पाट वाहीलेले  रुधीरात नाहलेले शिवसैन्य चालते

Friday 2 August 2019

डोळ्यांचे बनोनी घन

डोळ्यांचे बनोनी घन
कित्येक बरसल्या राती
उगाच होते बरसने ते
कोणा परक्यांसाठी

पाचोळ्यागत उडाल्या
मनशिशिरातुन भावना
उगाच फुलल्या होत्या
कुणा आगंतुकासाठी

गढूळ झाला होता
विचारप्रवाह मनाचा
का उगा थांबला होता
संकुचित डबक्यापाशी

तुटले बांध धैर्याचे
मन तुटलेले  जेव्हा
मिच होतो माझा,
ना कोणी सावरण्यासाठी

Thursday 1 August 2019

आयुष्याच्या वाटेवर चार

भावनांचे विचित्र असे ओझे घेऊन
एकटेच जीवनवाटेवर चालताना वाटेत उंच पर्वत आणि खोल अश्या दर्या भेटतात ,काळे कभीन्न खडे कातळ आणि शिला,या कातळांची शिलांचीही  एक सुंदरता असते ,एरवी लोकाना गिरीकंदराची ओढ पाऊस पडल्यावर वाटत असेल ही पण ,ती हिरवळ अंगावर घेऊन नटण्यासाठी सहा महीने तरी उनवार्याशी आणि एकटेपणाशी या मंदराना झुंजावे लागतेच न तेव्हा या पर्वताला सोबती असतात ह्याच रानशिला
मग पाऊस येतो ,सर्व पर्वतराजी खुलून दिसु लागते आणि लोकांसोबत प्राण्यानाही ओढ पर्वतराजींची लागते ...
अशा प्रसिद्धीच्या काळातही ना पर्वत शिलाखंडांची ना शिलाखंड पर्वताची साथ सोडतात या उलट नवागताना आधार बनतात कारण दोघाना माहीती असते  सुगीचे दिवस गेल्यावर
एकटेपणा आहेच !
उत्कर्षाच्या काळात  पर्वत उतत नाही की शिलाखंड मातत नाही
आपल्या ही आयुष्यात काही लोक असेच असतात..नाही का ..

बाजी

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...