उग्रवीर क्रुद्धमहा तांडवात रुद्रजणू,
चपलचपलेहून प्रचंड शूल जणू
घनन् घनघोर चतुरंग भूप छत्रपती
खड्ग विखंडकारी म्लेंछ अरि सह्यपती
मेरुहुन उंच गढ उंच गढकोट पती
श्रीमंत श्री महादानी पुण्यशील श्रीपती
इंद्रही न चंद्रही प्रभावशाली सुर्य जणू
राजा शिवछत्रपती वैराग्यनृप जणू
No comments:
Post a Comment