भावनांचे विचित्र असे ओझे घेऊन
एकटेच जीवनवाटेवर चालताना वाटेत उंच पर्वत आणि खोल अश्या दर्या भेटतात ,काळे कभीन्न खडे कातळ आणि शिला,या कातळांची शिलांचीही एक सुंदरता असते ,एरवी लोकाना गिरीकंदराची ओढ पाऊस पडल्यावर वाटत असेल ही पण ,ती हिरवळ अंगावर घेऊन नटण्यासाठी सहा महीने तरी उनवार्याशी आणि एकटेपणाशी या मंदराना झुंजावे लागतेच न तेव्हा या पर्वताला सोबती असतात ह्याच रानशिला
मग पाऊस येतो ,सर्व पर्वतराजी खुलून दिसु लागते आणि लोकांसोबत प्राण्यानाही ओढ पर्वतराजींची लागते ...
अशा प्रसिद्धीच्या काळातही ना पर्वत शिलाखंडांची ना शिलाखंड पर्वताची साथ सोडतात या उलट नवागताना आधार बनतात कारण दोघाना माहीती असते सुगीचे दिवस गेल्यावर
एकटेपणा आहेच !
उत्कर्षाच्या काळात पर्वत उतत नाही की शिलाखंड मातत नाही
आपल्या ही आयुष्यात काही लोक असेच असतात..नाही का ..
बाजी
No comments:
Post a Comment