वृत्त मंजुघोषा
डाव येथे खेळताना हारलो होतो
मी सुखाला शोधताना हारलो होतो
साथ नाही चालतो मी एकटा वेडा
श्वास येथे चालताना हारलो होतो
उत्तरे मी शोधलेली सर्वची येथे
शांत येथे झोपताना हारलो होतो
युद्ध मोठे भावनांनी, छेडले जेव्हा
आसवे मी रोखताना, हारलो होतो
काय माझे शब्द मजला पारखे झाले
भाव येथे बोलताना ,हारलो होतो
No comments:
Post a Comment