वृत्त-देवप्रिया
संपलेले सर्व काटा रुतलेला राहिला
तोडले मी बंध धागा गुंफलेला राहिला
चालला हा चंद्र कोठे मैफिलीला सोडुनी
एक प्याला आठवांचा ओतलेला राहिला
वाटले हे सागरा रे मोकळे व्हावे जरा
तो रिते होता मनी नाला तुंबलेला राहीला
तासताना अंग सारे झाड झाले बोडखे
गंध गाभ्यातील तैसा छाटलेला राहीला
बाण शंकांचे किती मी रुतलेले काढले
एक अंती बाण का हा रुतलेला राहिला
जीर्ण होता बंगला जो गावठाणी पाडला
का चुना चिर्यामधे तो जोडलेला राहिला
कूट प्रश्नांची किती मी सोडवावी उत्तरे
प्रश्न अर्धा एकची हा सोडलेला राहिला
No comments:
Post a Comment