Thursday, 23 April 2020

राजमाता जिजाऊ

जय जिजाऊ ,जगदंबिके 
स्वराज्य बीज ,रोपिके
शिवरुद्र जननी ,भवानी
जय जय राष्ट्रधर्म, रक्षिके

शशीकुलसंभव,ज्वाला
रवीकुल तेज, दिप्तीके
महाराष्ट्र राजश्री ,लक्ष्मी
जय जयश्री ,जगदंबिके

Tuesday, 21 April 2020

कटाव

भाळी चंद्रकोर लेवूनी,साज चढवूनी
साडी  नेसूनी, हिरवा किन्खाप
राजसी ...
गुलाबी कळी,गाली ची खळी,
जशी पाकळी ,बहुत सुकुमार
मृगनयनी 
चंचला भारी,संयमारि 
चित्त ती हारी,सहज चालीत
रमणी पाहते
नेटकी  कशी ,नजर तीची कशी 
चालवी  जशी,नयनबाण
घायाळ
जखम ती काय ,भरावी हाय ,
काय उपाय ,राजसी आता
तुझा जो वार , 
दिलावर मार ,पडलो मी गार,
झालो शिकार,शिकारी आता 
बाजी©

Saturday, 18 April 2020

सवाल जवाब

बघतीस का लपवुनी भावना,
सखये बोल जराशी ,
लटके भांडण करुनी अशी,
पाठमोरी  बैसशी 
रागे भरलेल्या तव वदनी,
खुलून खळी उमटावी
वदन पाहता तव मनरमणी ,
हृदय'तरी' झुलावी
जणु एकट्या गर्दरानी हळुवार ,
झुळुक चलावी
स्पर्शुनी मग तनास तुझीया ,
शिरशिरी मनात उठावी
गर्दछायेच्या सापटीतून,
किरणे ती डोकावी
अन किरणांशी खेळत कुंतल ,
विजेरीसम चमकावी 
पसरले भुवरी गालीचे,
तृण स्पर्शुदे अंगाशी
होउ दे भावना एक ह्या,
आपुली प्रीत बहरावी
आसवमृग रोधुनी धर हा,
विरह आता संपला
बहुकष्टाने बहुवर्षाने ,
प्रेममळा राखला
हृदय का पाकळी जाहले,
स्मित तव पाहता
परतुनी आलो तुझ्याकरिता ,
आता जीव थकला
परि,
प्रेयसी होती ती ही मोठी,
सुंदर मनरमणी
सीमेवरची माझी लाडकी,
सवत तुझी संगिणी
माहीत होती तुजला आधीच,
माझी प्रेमकहाणी
बसलीस का मग स्वागत वेळी,
पाठ अशी फिरवुनी

#बाजी©
लपविता लपविणे भावना
जमते का रे राया
वाटेवरती हात सोडूनी
जमते का वाट पहाया
रुसले नाही तुझ्यावरी मी
स्वप्न सख्या रे भासे 
भास असे तुझ्या भेटीचे
नेहमी होती खासे
प्राण पाखरु वेडे माझे 
तुजकडे भरारी घेत
शवा सोडूनी जीवा करीता
झुरत राहते नित्य
वाटेवर त्या ऋतू लोटती
नजर अशी ना हलते
परतीच्या आशेवरी तुझिया
दिवस कसे मी जगते
डोळ्यात आसवे घेऊन भिजते
नशिबाचे हे देणे
कर्तव्याचे वाण लुटणे 
वीरपत्नीचे लेणे
असा सजूनी असतो नेहमी
साज तुझ्यासाठी
ताटात वेगळा असतो नेहमी
घास तुझ्यासाठी
बरे तरी शिशिरा मागूनी
वसंत नेहमी येतो
तुझ्या पाऊली मनात माझ्या
बहर फुलवूनी जातो




baaji

Friday, 17 April 2020

गडावरुनी



गडांवरुनी इतिहास बोलतो , रण मर्दानी जातीचा  
तो वीर एक जन्मला शिवाजी , वाघ मराठी मातीचा ||धृ||

भारत भू च्या उरावरी क्रूर,नाचत होता म्लेंछ कसा
लचके तोडून विद्ध जाहला,देशधर्म तो कधी असा
धूळ झटकावून पुर्व दिशेने,विजय रंग तो उधळविला
तारण्यास बहू हिंदू जना,अवतार शिवाने प्रकटविला ||1||

आग पेटली वणवा भडकला होम पेटे स्वातंत्र्याचा
तो वीर एक जन्मला शिवाजी , वाघ मराठी मातीचा

तलवार भवानी सळसळूनी,दुष्टा भिडला सह्याद्री
पोलाद मातीचे अलग करुनी, मजबुत बनलेल्या छाती
तट्टस्वार ठठ्ठाच्या खड्गे ,दुष्ट म्लेंछ तो मारियला
रणरंग मांडले मोठे जंगी,शौर्यसागरा खवळविला


हर महादेव हर महादेव हर घोष उडाला वीरगतीचा
तो वीर एक जन्मला शिवाजी , वाघ मराठी मातीचा





गडावरुनी इतिहास बोलतो

गडांवरुनी इतिहास बोलतो , रण मर्दानी जातीचा  
तो वीर एक जन्मला शिवाजी , वाघ मराठी मातीचा ||धृ||

भारत भू च्या उरावरी क्रूर,नाचत होता म्लेंछ कसा
लचके तोडून विद्ध जाहला,देशधर्म तो कधी असा
धूळ झटकावून पुर्व दिशेने,विजय रंग तो उधळविला
तारण्यास बहू हिंदू जना,अवतार शिवाने प्रकटविला ||1||


तलवार भवानी सळसळूनी,दुष्टा भिडला सह्याद्री
पोलाद मातीचे अलग करुनी मजबुत बनलेल्या छाती
तट्टावर ठठ्ठानी चढूनी ,दुष्ट म्लेंछ तो मारियला
रणरंग मांडले मोठे जंगी,शौर्यसागरा खवळविला

चुंबता ओठास गाली

चुंबता ओठास गाली सांग लाली कशी आली
हुंगता रात्री  दवांची सांग वर्षा कशी झाली

स्राव ओठी वाहिलेले जीभ तृषार्त वल्लरी
नेत्र मद्या प्राशले मी शुद्ध केव्हा तुझी गेली

स्पर्शिता अंगास तुझ्या रोम रोमांचून गेली
पौर्णिमेला छेडले अन तृतिया लाजुनी गेली

हात हाती घट्ट राती आज आलिंगनी आली
अन पहाटे रात वेडी सांग झोपी कशी गेली

नाहलो मी चिंब तू का सांग ओली कशी झाली
अंत उत्ताप प्रणयी माझ्यात तू वाहुनी गेली 

Friday, 10 April 2020

ये अशी माळून रातीला

ये अशी माळून रातीला तुझीया कुंतली
भृंग होऊनी उडू दे अत्तराचे भोवती
गुंग थोडे दंगही बेधुंद होऊ सोबती
वृक्षराजी चंद्रताऱ्या सोबती या भूतली

जे मनाच्या कोंदणी काढून घेऊ ताम्हणी
स्वप्न दोघे रंगवू लावून त्याला झालरी
ये अशी आलिंगनी होऊन वेडी वल्लरी
एक मी हो एक तू हो चंद्र मी तू चांदणी!

baaji©

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...