खरंच खुप अवघड आहे हे
अबोल राहणं
कारण आज अबोल राहीलो की त्रास होतो मनाला
भिती वाटु लागते क्षणांची
कोणी सोबत असेल तरी घुसमट असते आतुन ...
गंभीर अशीच.....
आणी मग भिती वाटु लागते सोबती ची ही
द्वंद्व असते विचारांचे, कळत नाही मला
तुला आठवणे सोपे आहे की विसरने अवघड
कारण दोन्ही वेळी त्रास मलाच होतो...
मग
भिती वाटु लागते विचांराचीही
पुर्णपणे आयुष्याचे क्षण व्यापलेस तु ...
अथांग असलेल मन व्यापलेस तु....
हे मन का
होऊन बसलय तुझ्या व्यक्तीरेखेचं गुलाम
अन घेतेय कोंडुन स्वतःस वेदनेच्या अंधारात.
आणी मग मला भिती वाटु लागते माझ्याच जीवनाची......
जीवनअर्घ्य
बाजी©
No comments:
Post a Comment