आयुष्य कस माझ्या साठी
अनोळखी सरोवरा सारख झाल बघ
विचित्र खुप विचित्र ......
ज्याप्रमाणे अशा सरोवराभोवती निशब्द शांतता आणी सोबत नैसर्गिक गोंगाट भरलेला असतो
मन ...देखील तसेच झालय
शांत निर्भाव .......
अन सोबतच
कसल्याशा अमुर्त ,अनामिक गोंधळाने भरलेलं
वरुन पाण्यासारखं शांत वाटतं सर्वाना ...
हसरं आणी आनंदी परंतु त्याआडची चाललेली घुसमट कधी कोणालाच कळत नाही....
आयुष्यात भोवती खुप सुगंध दरवळतो परंतु पाण्याखालील घुसमटीत त्या कडे लक्ष ही जात नाही...
दिवसात सोबत तरी असते मला लोकांची...
परंतु एकांत खायला उठतो मला भुकेल्या मगरी सारखा ..
आणी
आयुष्याच्या उन्हात मिच सुकुन जाऊ नये ही भिती वाटते
कारण
मिच सुकलो तर जवळ आहेत ते सुद्धा साथ सोडतील म्हणुन
मी सावरुन बाहेर पडतो......
बाजी©
जीवनअर्घ्य
No comments:
Post a Comment