Tuesday 15 August 2017

अर्धवट .....


आपल्या जगण्याच्या वाटा बदलल्या
आपले गुंफलेले हात सुटले
ते आश्रु तो एकांत ते दुःख ....सगळ मागे पडलय..
एव्हाना
तु गेलीस तेवा ज्या कोपर्याने माझे दुःख पाहीले ......
तो  ...तो ही मला अनोळखी झालाय....!
परंतु काहीसे काहीतरी अजुनही
त्या ठिकाणीच थांबलेय....
काय आहे ते कळतय तुला?
नाही नं ....
मला ही नाही....!
माझं आयुष्य चालत राहत .....तुझ चालत तसच..!
नाक श्वास घेतं..
हृदय ब्लड पंपिग करत राहत ...
मि चालत असतो ,    जगत असतो ...
माणसे भेटतात ...मला खुलवतात ...हसवतात ..त्रास ही देतात ...
.आणी दिवस सरतो ...रात्रीही सरतात ..
तुझं ही असच आहे नं
पण बघ ना ..
किती ही कुठे कसा ही मि गुंतलो
,.............................
तरी कोणी काहीही आणी कधीही
    थांबवत नाही मला..!
मि थांबतो....
फिरुन फिरुन  तिथेच ...!
.....तिथेच !
.......काहीतरी अजुनही अर्धवट सुटलेलं आहे  ..... !
कारण
अशा अर्धवट सुटलेल्या गोष्टी मनाला कायम त्रास देत राहतात...!
  हो ना !
अपुर्ण मी अपुर्ण तु अपुर्ण  कहानी आपली
अपुर्ण सुर अपुर्ण ताल  अपुर्ण प्रेमगीत आपुले
अपुर्ण हाथ अपुर्ण साथ अपुर्ण प्रवास आपुला
अपुर्ण वात अपुर्ण रात अपुर्ण सहवास आपुला
अपुर्ण मन अपुर्ण भावना अपुर्ण नाते आपुले
अपुर्ण मी अपुर्ण तु अपुर्ण कहानी आपुली

बाजी©
 

    

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...