अकाशाने ही एकदा खाली पडुन बघाव
धरतीने ही कधी उंच उडुन बघावं
तोडाव्यात सीमा नियमांनी स्वतःच्या
स्वप्नानेही झोपुन गाढ सुंदरस स्वप्न बघाव
अकाशाने ही एकदा खाली पडुन बघाव
धरतीने ही कधी उंच उडुन बघावं
तोडाव्यात सीमा नियमांनी स्वतःच्या
स्वप्नानेही झोपुन गाढ सुंदरस स्वप्न बघाव
सैतानाने ही एकदा जिकुन बघाव
अमर देवानं ही एकदा मरुन बघाव
वैरानं ही प्रेम करताना इथे
काट्यांनी ही एकदा बहरुन बघावं
आयुष्यान स्वतः जगुन बघाव
अग्नीचही अंग कधी शहारुन जाव
खोल खोल गर्तेत
समुद्रा,
तु ही एकदा बुडुन बघावस
बाजी