Sunday 1 July 2018

रे कृष्णा

रे कृष्णा पुन्हा गिता आम्हास सांग आता
कर्मयोग खरा तु आम्हास दाव आता
बोल आमचे हे बुडबुडे जलावरचे
या तरुणास आमच्या तु अर्जुन दाव आता

भरकटलो आम्ही राष्ट्राच्या अवघ्या साठीत ह्या
भरकटलेल्या यौवनास ह्या आशेचे क्षितिज दाव आता
पुराणे अवडंबरे कांडात धर्म उरला
राक्षसाचा दंभ ब्राह्मणी नाकात शिरला
वेदसंहीता उरल्या पाठ मुखोद्गत पंडीताच्या
गिता कपाटात पडल्या वाड्यात ब्राह्मणांच्या

धर्मवीर क्षत्रिय आज दर्पात पार बुडला
सोडुन खड्ग हातीचे म्लेंच्छपायी पडला
नशा चढली ताकतीची अंगीचा धर्म सुटला
तुझा क्षत्रिय हा आता नशेत पार बुडला

क्षितिजासम आभासी कृष्णा हा धर्म आज उरला
कामचुकार लंबोदरा हाती  कर्मयोग बघ उरला
कर्तव्यच्युत भरतपुत्र आज जातीत विभागला
आपल्याच सहउदराचा हिंदु वैरी आज बनला

घे चक्र आज पुन्हा तु हाती फिरव पुन्हा चाके
संपवुन टाक मन्वंतर वा आता अवतार पुन्हा घे
तु ओढ रथ अर्जुनाचा पुन्हा  रुप दाखविते ते
तु सांग गिता पुन्हा वा बुडव द्वारिके ते

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...