Sunday 1 July 2018

समाजा

किती रे छान पणे स्वतःच रुप लपवितोस
जो लोकांसमोर तुला उघडं पाडतो त्यालाच वेडा ठरवितोस
तु राजकारणी आहेस कि माथेफिरु कळत नाही मला
जो तुझी साथ सोडतो त्यालाच तु संपवितोस
तु भोंदु साधुच असशील वरवर सत्यप्रकाशाची आस धरणारा
आणि मनात घोर अंधार पाळणारा ,
श्रीमंतामागे धावणारी वेश्या ही तुच आहेस बस
पदर नाकभर ओढलेला पतिव्रता भासणारा
हळव्या लोकांस जीवंत गिळणारा नरभक्षी तु ,भावनाशुन्य असणारा
किती व्यक्तीमत्व आहेत नक्की, खरे ते कोणते तुलाच अगम्य आहे
अरे समाजा तु आहेसच बहुरुपी खर्या चेहर्याआड लाख काळे चेहरे
असणारा

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...