Sunday 22 September 2019

श्लेष अलंकार


श्रुत्यैकयानेकार्थ प्रतिपादन श्लेषः (पण्डितराजकृत लक्षण)

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

एक प्रयत्नौच्चार्यानाम् तच्छायाम् चैव विभ्रताम्
स्वरितादिगुणैर्भिन्नैबन्धः श्लिष्टमिहोच्यते (भट उद्भट)
अर्थात ,
एकाच प्रयत्नाने उच्चार करताना केवळ स्वर भिन्नतेमुळे एकमेकांची छाया असणार्या शब्दांच्या योजने मुळे श्लिष्ट अलंकार होतो

भामह आणी उद्भटाने श्लेष साठी श्लिष्ट हा शब्द वापरलेला

उदा :

सूर्य उगवला झाडीत...
झाडूवाली रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत...
अन् वाघहि तंगड्या झाडीत...
राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत" या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण

श्लेषालंकाराचे  दोन मुख्य प्रकार

शब्द श्लेष आणी अर्थश्लेष

*शब्दश्लेष*
भिन्न उच्चार असणारे  भिन्न अर्थ असणारे शब्द संधी मुळे किंवा एकसलग उच्चार करण्यामुळे सारखेच उच्चारले जातात  तो शब्दश्लेष अलंकार होतो

शब्दश्लेष चे दोन प्रकार पडता

*अभंग श्लेष*
जेथे शब्द न तोडता म्हणजे एकच शब्द दोन अर्थाने वापरलेला असतो तेथे सभंग श्लेष अलंकार होतो
उदा,
१)मिञाच्या उदयाने सर्वांनाच आनंद होतो
२)हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.

या वाक्यामध्ये मिञ चाअर्थ दोस्त किंवा सुर्य आणी दुसर्या उदाहरणात
जीवन शब्दाऐवजी पाणी आणी आयुष्य यात एक शब्द  दोन अर्थाने शब्द वापरण्यात आलेले म्हणून हा अभंग श्लेष होतो
*सभंग श्लेष*
सभंग श्लेष मध्ये भिन्न अर्थाचे शब्द केवळ उच्चारामुळे सारखे वाटतात 
जसे कि
उदा :

श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी

यात वेगळ्या अर्थाचे दोन शब्द केवळ  उच्चारामुळे सारखे वाटतात म्हणून येथे सभंग श्लेष अलंकार होतो .

कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तिळ यांस,
तरी तुम्हांस अर्पिली सु-मने

ते शीतलोपचारे जागी झाली ,हळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला, परिसुनि माता 'बरे' म्हणूनी डोले

हा शब्दश्लेष सभंग आणि अभंग असा द्विविध असून अर्थालंकारच असतो.” असे उद्‌भटानुयायी लोकांचें म्हणणें.
“हे दोन्हीही शब्दालंकारच; कारण यांच्यांत शब्द बदलतां येत नसल्यानें अन्वय व व्यतिरेक या प्रमाणांनीं येथील अर्थ शब्दावरच अवलंबून आहे, हें सिद्ध होतें. आतां श्लेषाचा तिसरा प्रकार मात्र अर्थालंकार मानला पाहिजे, कारण तो केवळ अर्थावरच अवलंबून आहे”

अर्थश्लेष
वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

उदा :

तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच

या आर्येतील मलिन, कुटिल, नीरस जड हे शब्द बदलून त्याच अर्थाने दुसरे शब्द वापरले तरी श्लिष्ट नाहीसा होत नाही.

श्लेष अलंकारामध्ये श्लेष चमत्कृतीमुळे इतर अलंकारांची प्रतिभा उत्पन्न होते अशा ठिकाणी
श्लेष प्रधान व इतर अलंकार  सहायक  मानावा असे उद्भट सांगतो

संदर्भ,
भामहकृत काव्यालंकार ..देवेंद्रनाथ शर्मा
उद्भट कृत काव्यालंकार सारसंग्रह
अलंकार कौमुदी..परमेश्वरानंद
रसगंगाधर
अलंकार चंद्रिका ,गणेश गोरे

बाजी©®
omkarpandav.blogspot.com

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...