Sunday, 24 June 2018

आधार

आधाराशिवाय वाढलेली रोपटी पुढे अजस्त्र आकाराच फळाफुलांनी बहरुन कित्येका साठी आधार बनलेला वृक्ष बनत असला तरी काही रोपटी आधाराविणा जळताना ही पाहीली आहेत , खुंटताना पाहीली आहेत आणि दिशाहीन पणे वाढताना पाहीली आहेत .
फरक असतो जिद्दीचा  ही जिद्दच असते ,
जगण्याची !
जी सक्षम बनविते जगण्यासाठी ,विचार देते प्रगतीसाठी आणि दिशा दाखविते वाढण्यासाठी
म्हणुन आधार नसलेल्या रोपट्याना स्वतःचा आधार स्वतःच बनुन आभाळाला आव्हान द्यायला जमतं
डोक्यावर आभाळ नसलेल्या पाखराना आपलं आभाळ स्वतःच निर्माण करायला जमत  तर
अनाथाला स्वतःचा बाप स्वतः बनायला जमत !
तो अनाथ कधी आत्महत्या करत नाही ,
ते पाखरु कधी उडणे सोडत नाही की
ते रोपटे जगण्याची आशा सोडत नाही !
कमी वेळात आधार घेऊन वर चढलेली वेली काही दिवस आधारहिन संथ गतीने   वाढणार्या रोपाला वाकुल्या दाखवितील ही परंतु एकदिवस  तशा असंख्य वेलींचा आधार त्या झाडालाच बनावे लागते .
या खडतर प्रवासात तो नुसता शरिराने नाही तर मनाने ही मोठा झालेला दिसतो तर शरिरासोबत मन ही तितकेच अजस्र मोठे आणि सर्वसमावेशक
मोकळे बनलेले असते .ही मोठी देणं त्या अनाथास मिळालेली असते जी
त्यामार्गावरुन जाणार्या प्रत्येक वाटसरुस नियतीने शिदोरी स्वरुप आयुष्यभर पुरेल इतकी बांधलेली असते ,
आणि तो वाटसरु ही तिच्या शी वचनबद्ध असतो की ही शिदोरी "माझ्यां" 'साठीच असेल अंतस्थः ते "माझे" म्हणजे सर्व जगच तो समजत असतो
ही मनाची विशालता त्यावर त्या प्रवासातच भाळलेली असते ...

बाजी©

Friday, 22 June 2018

आज उजळली

आज उजळली घोर रात्र
तु नभांगणी येता
विसरला चंद्र नक्षत्रास
तुझे रुप पाहता
परावर्त चंद्रकिरणासम
तुजमुखाची प्रभा
त्या दाक्षायणी हरवल्या
हे लावण्य तुझे पाहता

हातांत लाजुन चेहरा
तु असा लपविलेला
गोड गुलाबी गुलाब
जसा कळीत लपलेला

Friday, 15 June 2018

इक और से मै चाहु तुझे

इक और से मै चाहु तुझे
इक और से तु चाहे मुझे
इक और बसा है यह दिल
कही और यह दिल धडके

कही और गिरे सावन की बारिश
भिगे कही और यह तन जलमे
भिगे कही और तन फिर क्यु
जलता है दिल उसकी याद मे

बाजी

Thursday, 26 April 2018

यमधर्मा..

यमधर्मा एवढे ऐकशील का ?
मला वेळ थोडा देशील का ?
कधी न सांगता तिला
घर सोडले नाही मी
आता माझ्या प्रवासाचा
निरोप तु देशील का ?

उशीरा  परतुन येताना
तिचा  चिंतेने ग्लानिस्त
चेहरा आज ही आठवतो मला
आज मृत्युशय्येवर या
तिच्या  चिंतेतील माया आठवते मला
हसतमुख तिला निरोप मला देऊ देशील का ?
यमधर्मा माझ एवढे तु ऐकशील का ?


Saturday, 21 April 2018

हात हाती देऊन सये

हात हाती देऊन सये वचन तु देशील का
मन मी झालो जरी भाव तु होशील का
हात हाती घेऊनी हृदयी लावशील का
भाव मी झालो जरी स्पर्श तु होशील का ?||1||

हात हाती देऊनी सये वचन तु देशील का

उधाणल्या मनी आता लहरी उसळशील का
मन लहर मी झालो जरी पवन तु होशील का
नयन पाहता भरतीस  मनसागर पावतो का
पवन मी झालो जरी पुर्णचंद्र तु होशील का ? ||2||

हात हाती देऊनी सये वचन तु देशील का

शरीर महाली माझीया हृदयी राहशील का
बनोन हृदय स्पंदने  छातीत धडकशील कां
स्पंदनाच्या धडधडीतला श्वास तु होशील का
श्वास मी झालो जरी प्राणवायु तु होशील का ? ||3||

बाजी©

त्या रात्रीचा पाऊस

त्या रात्रीचा पाऊस सखे
अजुन ही पडतोच आहे
डोळ्यातुन विरह मृग
अजुन ही झडतोच आहे

त्या रात्रीचा पाऊस सखे
अजुन ही भिजवतो आहे
हृदयातील वणवा माझ्या
अजुन विझतोच आहे

त्या रात्रीचा पाउस सखे
गंध मातीतुन उधळितोच आहे
मन तुझ्या आठवणींच्या
सहवासात गुंतवितोच आहे

त्या रात्रीचा पाऊस सखे
अंग अजुन शाहारितोय
उब तुझ्या श्वासांची आज
पुन्हा आठवितो आहे

बाजी©

Tuesday, 17 April 2018

सत्ताविसवे नक्षत्र

लेवुनी  लावण्य आलीसी कोठोनी
पुसती माझे मन तुजला
  नजर अशी नेटकी रम्ये 
पाहता बघ हा जीव भुलला
मृगसम सुंदर चाल अशी
तु न वाटसी या धरेची
विचार करता हे मन बोले
न असे सौंदर्य  अन्यत्र पहा
हळुवार कानशीली वारा बोले
हे तर सत्तावीसवे नक्षत्र अहा

तु तर सत्ताविसवे नक्षत्र नां

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...