Saturday 21 April 2018

हात हाती देऊन सये

हात हाती देऊन सये वचन तु देशील का
मन मी झालो जरी भाव तु होशील का
हात हाती घेऊनी हृदयी लावशील का
भाव मी झालो जरी स्पर्श तु होशील का ?||1||

हात हाती देऊनी सये वचन तु देशील का

उधाणल्या मनी आता लहरी उसळशील का
मन लहर मी झालो जरी पवन तु होशील का
नयन पाहता भरतीस  मनसागर पावतो का
पवन मी झालो जरी पुर्णचंद्र तु होशील का ? ||2||

हात हाती देऊनी सये वचन तु देशील का

शरीर महाली माझीया हृदयी राहशील का
बनोन हृदय स्पंदने  छातीत धडकशील कां
स्पंदनाच्या धडधडीतला श्वास तु होशील का
श्वास मी झालो जरी प्राणवायु तु होशील का ? ||3||

बाजी©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...