त्या रात्रीचा पाऊस सखे
अजुन ही पडतोच आहे
डोळ्यातुन विरह मृग
अजुन ही झडतोच आहे
त्या रात्रीचा पाऊस सखे
अजुन ही भिजवतो आहे
हृदयातील वणवा माझ्या
अजुन विझतोच आहे
त्या रात्रीचा पाउस सखे
गंध मातीतुन उधळितोच आहे
मन तुझ्या आठवणींच्या
सहवासात गुंतवितोच आहे
त्या रात्रीचा पाऊस सखे
अंग अजुन शाहारितोय
उब तुझ्या श्वासांची आज
पुन्हा आठवितो आहे
बाजी©
No comments:
Post a Comment