यमधर्मा एवढे ऐकशील का ?
मला वेळ थोडा देशील का ?
कधी न सांगता तिला
घर सोडले नाही मी
आता माझ्या प्रवासाचा
निरोप तु देशील का ?
उशीरा परतुन येताना
तिचा चिंतेने ग्लानिस्त
चेहरा आज ही आठवतो मला
आज मृत्युशय्येवर या
तिच्या चिंतेतील माया आठवते मला
हसतमुख तिला निरोप मला देऊ देशील का ?
यमधर्मा माझ एवढे तु ऐकशील का ?
No comments:
Post a Comment