लेवुनी लावण्य आलीसी कोठोनी
पुसती माझे मन तुजला
नजर अशी नेटकी रम्ये
पाहता बघ हा जीव भुलला
मृगसम सुंदर चाल अशी
तु न वाटसी या धरेची
विचार करता हे मन बोले
न असे सौंदर्य अन्यत्र पहा
हळुवार कानशीली वारा बोले
हे तर सत्तावीसवे नक्षत्र अहा
तु तर सत्ताविसवे नक्षत्र नां
No comments:
Post a Comment