Thursday, 28 April 2016

ये परतुनी भाग चौथा

चल चल पटकन पान उलटं !
आता विनुची उत्सुकता चाळवली गेली पण तोपर्यंत चहा आणी भजी संपली होती म्हणुन मग रवी विनुची इच्छा नसतानाही डायरी बंद करुन उठतो
चला राजे उर्वरीत भाग घरी गेल्यावर हा!
ये यार अस असत का राव !
विनु जरा कथा ऐकायला जास्तच excited झालेलाअसतो
पण रवी काही एक न ऐकता कँटीन बाहेर जवळ जवळ पळतोच
त्याला पकडण्याचा प्रयत्न करायला विनय पण पळतो
आरे थांब थांब  ! च्यायला काय मुड खराब केलास राव !

आस म्हणत तो खोटंखोट पाठलाग करत आसतो
तो  रवी
गेट मधुन बाहेर पडुन रस्ता क्रॉस करत आसतो !
विनु गेट जवळ येतो तो त्याला विचित्र दृश्य दिसत

रवी एका स्कूटीला धडकता धडकता वाचुन पाय सटकुन खाली बसलेला असतो ,
वही रस्त्याच्या एकाकडेला पडलेली असते  ,
आणी तो मुर्खासारखा स्कुटीवाल्या मुलीकडं बघत असतो
    विनुला विचित्र वाटत ती मुलगीही याच्याकड बघुन हसत असते
का कुणास ठाऊक जणु या आधी ते एकमेकांना ओळखात होते ?
पण हा सगळा विचार सोडुन विनु त्याच्याकड बघुन फिदी फीदी हसायला लागला !
साल्या तुला एक मिनीट एकट काय सोडल तु तर मरणाच्या दारातच येऊन टेकलास की रे!
कायम सोडून गेलो तर काय होईल , येडं कुठलं !
आणी पुन्हा हसला ,
रवी सावरुन उठला त्या मुलीला काही न बोलता फक्त हसला आणी मग विनुनी आधार देत ,
हात खांद्यावर घेऊन त्याला रुमवर नेल !
जाताना तो ही त्या मुलीकड पाहत होता ती भेट हृदयात साठवत होता ,
का कुणास ठाऊक विनुला प्रश्न पडला
ही तीची आणी त्याची पहीली भेट होती ?
मनानं उत्तर दिलं ......नाही निश्चितच नाही रे!

दुसर्या दिवशी
    ये विन्या चहा घे ना यार ,
अंथरुनातुन रवी आळसावुन बोलला ,
       साल्या मि काय तु झी बायको आहे काय ! येवढी order सोडायला !
   विनु चिडला !
love u जानु !  घे की  !
रवी ते ते मजाक करायला !
विन्या
जानु गेली खड्यात मि चहा आणतो तु ती डायरी काढ !
आता ग बया इसरेलच कि मी !
     रवी मिश्कीलपणा उफाळुन आला ,
विनु मात्र चिडला ,
       जाड्या चहा पाहीजे ना ,गुपचुप काढ डायरी  बाहेर
मि आणतोय चहा
च्यायला उगाच बोर माराययलाय!!
विनु चहा आणतो ,रवी वाचायला सुरुवात करतो ,
  तसा माझा अन कवितेचा काहीच संबंध नवता पण तिला भेटल्यावर
रवी पुढे  वाचु लागला ,
काही जणाना वाटत प्रेमात पडलं की
भावना शब्दांच्या अंगणात नाचु लागतात ,
आठवणीच्या निशाण्यावर शब्दाचे तीर भावनांच्या कमानीवर आरुढ होऊन मनास विद्ध करतात ,
गिरीनिर्झर हे धावत प्रेयसीला भेटायला निघालेल्या प्रियकरासारखे भासतात ,तर 
निरभ्र आकाश कुणी असंख्य युगुलांचे स्मृतीस्थानच वाटु लागते ,
वर दिसनारा प्रत्येक मेघ मेघदुता सारखा वाटत तिला संदेश पोचविल मनातला ?
पण या अलंकारिक कल्पना वरकरणी कितीही सुंदर वाटतील पण शाश्वत जगात असं काही नसत ना !

जगलो तुझ्यासाठी ,तु बघ जगुन मजसाठी
एकदाच
रडलो मि तुजसाठी,तु फक्त हुंदका काढ मजसाठी
एकदाच
बोललो असेल तुझ्याशी कितीतरी,
प्रेम व्यक्त करण्याची संधी दे
एकदाच
तु भेटलीस आयुष्यात अनेकदा,
             ती  पहीली भेट पुन्हा अनुभवु दे  एकदाच  !
..............

मि पुन्हा तिला भेटलो कॉलेजच्या introduction च्या कार्याक्रमाला

योगायोग ही गोष्ट सत्यात असते किंवा काय याबाबत शंका असली तरी माझ्याबाबतीत ही गोष्ट असावी अस वाटत ,
पण तीच नाव आगदी माझ्या नावाआधी आलं होतं म्हणजे हे मला माझं नाव आल्यावर कळलं हा ,
तिच्याबद्दल ती बोलताना मि तर मुग्ध होऊन जीव कानात अन डोळ्यात आणुन बघु लागलो ,
नंतर माझी बारी आ होती माझ नाव पुकारलं मि आपला निघालो ,
कसबस उभा राहुन नाव सांगितलं,समोरचे सगळेच चेहरे नविन होते एक सोडला तर ,
ततपप करीत सांगत होतो का कुणास ठाऊक पण माझ्याकडुन ती बोलली ते पुन्हा सेम बोलणं गेलं
बहुधा तिच्या लक्षात आल असाव
कारण ति हळु हसत होती ,
मि मात्र पोरीसारखा लाजुन थिजायचा बाकी होतो ,
कसबस उरकलं बोलणं मि
आणी जवळ जवळ पळत येऊन बेंचवर बसलो !
धाप लागली होती ,छातीत स्पंदने तीव्र गतीने धावत होती ,कपाळावर घर्मबिंदु येव्हाना जमा झाले होते आणी मि विचित्र मानसिकतेत होतो ,
हळुहळु वेळ झाली तशी स्पंदने कमी झाली तशी
कपाळावरील घर्मबिंदुंची गर्दी कमी होऊन मनात विचारांची गर्दी जमु लागली !
गर्दी ? हो गर्दीच ती कोणतीही दिशा नसलेले विचार जेव्हा मनात एकमेकांवर येउन आदळतात ना तेव्हा ती गर्दीच असते .
विचाराना एक मार्ग आणी लक्ष्य असेल तर विचार विचार ठरतो
नाही तर ती गर्दीच असते .
  परंतु नवीन मित्रांमुळे त्यात रमता मात्र आला नाही आणी कार्यक्रम संपला !

Monday, 25 April 2016

लिहायला कवितेस घ्यावे

तुझ्यासाठी लिहायला असं
          कवितेस घ्यावे !
पेन तर कागदावर टेकावा पण य ना
           लिहीणेच विसरावे ,
रेषा दिसाव्या भरकटताना
       का शब्द ही न स्फुरावे ,
एकटेपणी मावळतीस
        शांतपणे पहावे
पसरुन पाय कुरणावर
           निर्धास्त पडावे
चहुदिशा दिसाव्या झाकोळताना
      का रंग ही न दिसावे .
कधी कधी
गंधीत रिपरीप पावसात पहील्या
         पिसाटुन नाचावे
. घेऊन अंगावर नक्षत्र सरी
      मनसोक्त भिजावे
हुडपणे अंगणी भिजताना
       का सर्वांग शहारावे
          
.
.रावण©

न भंग हो

भंग हो रहो अभंग
ग सखे हे मन दोघांचे
नाते गंधासमवेत वायुचे
गंध सोबती कमलाचा
हा गुण असावा संसारी.
.
.
.बाजीराव©

Sunday, 24 April 2016

गेलीस...

सोडलास हात जेवा
गेलीस निघुन अशी
बोलवलं ही असत परत
पण वाटलं वेळ गेली होती
रंगलो होतो सुखस्वप्नात
बागडत होतो स्व छंदात
मोडुन सुखाची झोप अशी ही
गेलीस निघुन अशी
बनुन कल्पनेच फुलपाखरु
विहरत होतो फुलबागात
प्रेमफुलाचे पराग वेचित
का रमलो होतो स्वविश्वात
तु बाग मोडीली कल्पनेची
फुले तोडीली भावनांची
तरीही  राग न भरता विचारतो
का गेलीस निघुन अशी
बोलावलं ही असत परत
पण
वेळ गेली होती?
रावण

Saturday, 23 April 2016

आज्जीच म्हणंन

आस आज्जीचं म्हणणं होतं हा!

म्हणलं सहज आजीला विचारावं स्त्री हक्काबद्दल !
तर मि विचारलं !
तरृ आजी तर भडकली
म्हणे
स्त्री ही आदीशक्ती  आहे ,हे वेदानी सांगितलं ,
अशी शक्ती जित सर्व सृष्टीसंस्कृती व धर्माचे सृजन करण्याची ताकद आहे !
म्हटल बर मग
हेच धर्मानी बंधन का घालावे स्रीवर ?
आज्जी एक उत्तर दिलं
म्हणे
शक्ती ती कुठलीही असो
     बाहुंची असो पैशाची असो सत्तेची असो ज्ञानाची असो    गरजेपेक्षा अती झालीतर विनाशच करते !
सारांश कुठलीही शक्ती कंट्रोलमधे असेल तरच ठिक असते
म्हणुन काही तिला खुलं सोडता येत नाही ,
स्त्रीचं ही असंच आहे ,
   ,.......या महान शक्तीला अतीमुक्त सोडाल तर ती कृदाचित स्वैर संचार करेल  अन ही शक्ती जर स्वैर संचार करु लागेल तर संस्कृती धर्म आणी देशाचा विनाश नक्की आहे !
म्हणुन हे निर्बंध होते !
आता स्वातंत्र्याच्या नावाखाली व modernisation  च्या नावाखाली चाललाय बायांचा केवळ स्वैराचार !.
.
.
.शब्दांकन जरी माझं असलं तरी बोल अन भावँ एका जुण्या माणसाचेच आहेत !
बघा विचार करा!
बाजीराव©

येईल मि

अवश्य मी येईल बोलाविता
   तु अवाज दे
अवश्य मी तरेन जलसिंधु
  तु आवाज दे
उठतील तरंग स्तब्ध जलावरीही
घोंगावेल वारा माडातुनी
हलतील बद्ध नौकाही ग
तु खरंच एकदा
अवाज दे !
पहाटतारा निखळताना
तु अवाज दे
प्राजक्त कुसम भुवरी झडताना
तु आवाज दे
बरसेल त्या दवतृणावरी
शहारुन उठतील रोम शरीरी
लहर सुखाची उठेल जर ही ,
आठवेल मि ह्या वेळी गं !
तर
         तु खरच एकदा
           आवाज दे ,
            

हा हिंद

हा हिंदसिंध पासोनी  सिधुतीरी
गाजवु रण हे बनोन अकृतव्रण
घडवु अगम्य हिंदक्रांती ही
जागवु भारतभुचा  कणकण!

बाजीराव©

Saturday, 16 April 2016

बहीण

Dedicated to my sister praju taai
असावी रे लहान  बहीण ,
...... ,,,
...मुर्खा म्हणुन चिडवणारी,
....,कधी रागाने भांडणारी
अन
कधी बाहुली साठी  रडणारी,
....रडता रडता मला बघुन
.,...... प्रेमानी दादा म्हणणारी,
असावी एक मोठी बहीण!
....बाहेर फिरल्यावर शिक्षा करणारी ,
लहानपणी होमवर्कसाठी मारणारी,
कॉलेजात पोरींकड लक्ष देऊ नकोस अस सांगणारी,
हळुच कधीतरी वहीनी कशी दिसते ,
विचारणारी !.
असावी रे एक  बहीण

 
,.........

Thursday, 14 April 2016

भारत माता की जय

भारत एक महान देश!
हे म्हणतो आपण पण एक पाच टक्के महान लोक सोडले तर खरच भारतातील लोक महान आहेतका हा प्रश्न त्यांच्या वागण्यावरुन पडतो ?
भारत अस्वच्छ का आहे याबाबतीत पाश्चात्त्यंच निरीक्षण ऐकल होत की
भारतातले लोक स्वच्छ आहेत म्हणुन भारत अस्वच्छ आहे .......
कारण आम्ही बसण्यापुर्ती जागा फुंकणारे आणी चहाचे प्लास्टीक कप रस्त्यावर फेकण्यात अर्धवट शहाणपणा समजतो
हे त्या गोष्टीसारखच आहे,
वादाचा विषय, दुर्दैवाने...

भारत माता की जय !

आरे आरे अचंबीत होऊ नका
...,.. देशाला माता म्हणन धर्माविरूद्ध वाटत कारण माता स्त्री असते ना
आणी आम्हा पुरुषांलेखी
स्त्री दुर्बलतेच प्रतीक !
स्री एक भोगवस्तु ! फारतर काय
स्त्री एक प्रजोत्पादनाची मशिन !
.
.
तीला महान म्हणन तिचा जयकार करण म्हणजे
सिंघमच्या डायलॉग सारख पुरुषांचा इगो हर्ट नही करणेका !
मि हे का सांगतोय खरं
ह्याचा आणी धर्माज्ञांचा काय संबंध मि भावनावशते बोलतोय अस वाटृतय का ?

नाही हो !
लक्षात घ्या ,मुळ धर्मस्थापकांनी स्थलकाळानुरुप नियम बनवले ते त्या काळाशी सुसंगत होते आवश्यक होते!
पुढे धृर्ममार्तंड व समाज
दोन्ही समान जबाबदार !
यांनी शब्दाचा अपभ्रंष करावा तैसा यां नियमांचा केलाच की ,
   ह्या गोष्टी स्वतःला  श्रेष्ठ समजण्याच्या पुरुषी मानसिकतेमुळे घडतात हे तर नक्कीच आहे !
यां दोन्ही गोष्टींच्या समान बेरजेमुळेच बहुधा ही धर्मतत्वे बनली जी देशाला धर्मापेक्षा हीनता असल्याचे निर्देशक आहे !
हे झालं धर्माचा एखाद्या गोष्टीला स्त्री म्हणण्याबद्दलचा होणारा आक्षेपावरील विवेचण अथवा माझी भडास
आता ही बाजु बघुत
रामायणातला श्लोक आहे एक
  अपी तु स्वर्णमयी लंका.......
जननी जन्मभुमीश्च स्वर्गादपी गरियसी
.
.लक्षमणाठिकाणची
भावना की जननी जन्मभुमी स्वर्गाहुन सुंदर आहे .
ओवेसी जे राजकारण करतोय त्याची मुळ हैदराबाद च्याच इतीहासात आहेत !
उस्मानीया विद्यापीठ ने हिंदु विद्यार्थ्यांना वंदे मातरम म्हणण्यास बंदी घातली होती
.
आरेच्चा मि हिंदु हा शब्द काढला तर मि आता असहीष्णु झालो असेल नाही का !
आरे
गाढव म्हणा पण.....
    ......हिंदु नको अस म्हणनं म्हणजे  जर सहीष्णुता असलं तर लाथ मारतो अशा सहीष्णुतेस !
कसली ही एकतर्फी सहीष्णुता !
हिंदु हा शब्द  सिंधुपलिकृडील रहीवासी लोकांकरीता वापरला जातो हे सत्य आहेच की
सावरकरांनीच व्याख्या सांगितलीय ना
  असिंधुसिंधुपर्यंता ......
सिंधुनदीपासुन ते सिंधुसागरापर्यंतच्या भुभागास जो आपली मातृभु व कर्मभु मानतो तो हिंदु !
मग काय problem काय आहे !
आपण ज्या देशात जन्मलो !
जन्मता आपल्याला तीन माता आसतात अस लहानपणी सांगितल जात आम्हाला
एक आपली आई
गाय जी तिच दुध देऊन पोषण करते
आणी तिसरी ही जमिन
  पालन करते पोषणही करते अन मेल्यानंतर सामावुन ही घेतेच की !
याहुन मोठी गोष्ठ कोणती असेल
  
मग भारत माता की जय अस म्हणायला साला तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या आईवर शंका काय फरकृ पडतो की ति जन्मभुमी आहे की जन्मदात्री आहे ही गोष्ट लक्षात येते की नाही !
यामुळे हे म्हणन जर धर्माविरुद्ध असेल तर मातेच स्थान धर्मात इतक खाली आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर मिळेल!

Bachelor

Bachelor ते bachelor असतात
नसली दमडी खिशात
तरी श्रीमंताचे बाप असतात
हो
उद्योगपतीचे बाप असतात कारण असे उद्योग सांगा कुणाचे पती करतात?
सेमचे चार महीने आठवड्याला इवेंट करतात
लेक्चर सोडुन कालेजचे सोशल गोष्टी करित बसतात
कारण
bachelor  ते bachelor असतात
ह्यांचे डोके म्हणजे लेकाहो f 1 च्या
सुसाट भन्नाट गाड्या असतात
पारा कॉलेजच्या दररोज विधानसभा भरवित असतात
हो विधानसभा भरत असतात
अन ह्या सभेतले आमदार दररोज विधेयक पारीत करतात!..
डिग्रीच्या कुंडलीत hod  असतो शनी
पण त्यालाही चुना लावुन
कुंडलतल्या स्टोर रुमला शिफ्ट कृरतात
कारण
bachelor  ते bachelor असतात

असते पँट एकाची कधी तर शर्ट दुसराच कुणाचा
रुम असतो एकाची ,रहीवास अख्या वर्गाचा
दिसला भंडारा कुठे गल्लीत ,
साले लगेच पंगतीवर डल्ला मारतात कारण .
bach.
..,
bachelor ते bachelor असतात
ते क्षणक्षण आयुष्याचे सोनेरी असतात
नसते लाज ना पैसा कसला मनाने साले श्रीमंत  असतात
कारण
जो सुगंध मैत्रीचा जो जोश तारुणतेचा
जसा bachelor घेतात
तसा सांगा कुठे किती रुपयाला विकतात!

बाजीराव© 

Saturday, 9 April 2016

उधारी

उधार आज मि भावना  घेतो 
भाव जरी माझे
उधार
आज मी डोळे घेतो
आश्रु जरी माझे
उधार मि शब्द घेतो
बोल जरी माझे
उधार मि काया घेतो
  हे  प्राण जरी तुझे !

ओम्या इज back ��

Saturday, 2 April 2016

म्हणुन काय झालं.....

आठवणींच एक पान गळाल म्हणुन काय झाल
आठवणी मनवहीतील तुझ्या अजुनही ताज्याच  आहेत                          वाहणारा भावनद मार्ग बदलून वाहतो आता  म्हणून काय झालं,त्याच उतारावर एक ओहोळ अजुनही तसाच आहे निराधार आहेत वाटा माझ्या एकट्याच मार्गी म्हणून काय झालं ,आधारास शोध तुझा अजून ही तसाच आहे                      तु नसलीस आयुष्यात सोबतीला म्हणुन काय झाल !                                 सावली सोबत तुझी अजुनही तशीच आहे  बाजी©

Friday, 1 April 2016

मि तुझा असावा

तु माझी मि तुझा असावा
या चांदरातीला गंध असावा
रातराणीच्या कळ्याभोवती
गुणगुणणारा भ्रमर असावा !

तु माझी मि तुझा असावा

हृदय अशी तु मी श्वास असावा
तव कृष्णअक्षातील दृश्य मनोहर
निरभ्र चमचम आकाशातील
  द्वितीयेचा मी चंद्र असावा !

तु माझी मि तुझा असावा
तु नसताना ,
भरतीस आलेला सिंधु असावा,
मन लाटा ह्या अतिउंच उठाव्या
प्रहारती जरी कड्याभोवती
ते साहणारा मि सह्य असावा ।

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...