भारत एक महान देश!
हे म्हणतो आपण पण एक पाच टक्के महान लोक सोडले तर खरच भारतातील लोक महान आहेतका हा प्रश्न त्यांच्या वागण्यावरुन पडतो ?
भारत अस्वच्छ का आहे याबाबतीत पाश्चात्त्यंच निरीक्षण ऐकल होत की
भारतातले लोक स्वच्छ आहेत म्हणुन भारत अस्वच्छ आहे .......
कारण आम्ही बसण्यापुर्ती जागा फुंकणारे आणी चहाचे प्लास्टीक कप रस्त्यावर फेकण्यात अर्धवट शहाणपणा समजतो
हे त्या गोष्टीसारखच आहे,
वादाचा विषय, दुर्दैवाने...
भारत माता की जय !
आरे आरे अचंबीत होऊ नका
...,.. देशाला माता म्हणन धर्माविरूद्ध वाटत कारण माता स्त्री असते ना
आणी आम्हा पुरुषांलेखी
स्त्री दुर्बलतेच प्रतीक !
स्री एक भोगवस्तु ! फारतर काय
स्त्री एक प्रजोत्पादनाची मशिन !
.
.
तीला महान म्हणन तिचा जयकार करण म्हणजे
सिंघमच्या डायलॉग सारख पुरुषांचा इगो हर्ट नही करणेका !
मि हे का सांगतोय खरं
ह्याचा आणी धर्माज्ञांचा काय संबंध मि भावनावशते बोलतोय अस वाटृतय का ?
नाही हो !
लक्षात घ्या ,मुळ धर्मस्थापकांनी स्थलकाळानुरुप नियम बनवले ते त्या काळाशी सुसंगत होते आवश्यक होते!
पुढे धृर्ममार्तंड व समाज
दोन्ही समान जबाबदार !
यांनी शब्दाचा अपभ्रंष करावा तैसा यां नियमांचा केलाच की ,
ह्या गोष्टी स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या पुरुषी मानसिकतेमुळे घडतात हे तर नक्कीच आहे !
यां दोन्ही गोष्टींच्या समान बेरजेमुळेच बहुधा ही धर्मतत्वे बनली जी देशाला धर्मापेक्षा हीनता असल्याचे निर्देशक आहे !
हे झालं धर्माचा एखाद्या गोष्टीला स्त्री म्हणण्याबद्दलचा होणारा आक्षेपावरील विवेचण अथवा माझी भडास
आता ही बाजु बघुत
रामायणातला श्लोक आहे एक
अपी तु स्वर्णमयी लंका.......
जननी जन्मभुमीश्च स्वर्गादपी गरियसी
.
.लक्षमणाठिकाणची
भावना की जननी जन्मभुमी स्वर्गाहुन सुंदर आहे .
ओवेसी जे राजकारण करतोय त्याची मुळ हैदराबाद च्याच इतीहासात आहेत !
उस्मानीया विद्यापीठ ने हिंदु विद्यार्थ्यांना वंदे मातरम म्हणण्यास बंदी घातली होती
.
आरेच्चा मि हिंदु हा शब्द काढला तर मि आता असहीष्णु झालो असेल नाही का !
आरे
गाढव म्हणा पण.....
......हिंदु नको अस म्हणनं म्हणजे जर सहीष्णुता असलं तर लाथ मारतो अशा सहीष्णुतेस !
कसली ही एकतर्फी सहीष्णुता !
हिंदु हा शब्द सिंधुपलिकृडील रहीवासी लोकांकरीता वापरला जातो हे सत्य आहेच की
सावरकरांनीच व्याख्या सांगितलीय ना
असिंधुसिंधुपर्यंता ......
सिंधुनदीपासुन ते सिंधुसागरापर्यंतच्या भुभागास जो आपली मातृभु व कर्मभु मानतो तो हिंदु !
मग काय problem काय आहे !
आपण ज्या देशात जन्मलो !
जन्मता आपल्याला तीन माता आसतात अस लहानपणी सांगितल जात आम्हाला
एक आपली आई
गाय जी तिच दुध देऊन पोषण करते
आणी तिसरी ही जमिन
पालन करते पोषणही करते अन मेल्यानंतर सामावुन ही घेतेच की !
याहुन मोठी गोष्ठ कोणती असेल
मग भारत माता की जय अस म्हणायला साला तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या आईवर शंका काय फरकृ पडतो की ति जन्मभुमी आहे की जन्मदात्री आहे ही गोष्ट लक्षात येते की नाही !
यामुळे हे म्हणन जर धर्माविरुद्ध असेल तर मातेच स्थान धर्मात इतक खाली आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर मिळेल!
महान विचार देशाचे.
ReplyDeleteगर्वाचे.. हिंद राष्ट्राचे.... अवश्य वाचण्या सारखे..