Thursday 28 April 2016

ये परतुनी भाग चौथा

चल चल पटकन पान उलटं !
आता विनुची उत्सुकता चाळवली गेली पण तोपर्यंत चहा आणी भजी संपली होती म्हणुन मग रवी विनुची इच्छा नसतानाही डायरी बंद करुन उठतो
चला राजे उर्वरीत भाग घरी गेल्यावर हा!
ये यार अस असत का राव !
विनु जरा कथा ऐकायला जास्तच excited झालेलाअसतो
पण रवी काही एक न ऐकता कँटीन बाहेर जवळ जवळ पळतोच
त्याला पकडण्याचा प्रयत्न करायला विनय पण पळतो
आरे थांब थांब  ! च्यायला काय मुड खराब केलास राव !

आस म्हणत तो खोटंखोट पाठलाग करत आसतो
तो  रवी
गेट मधुन बाहेर पडुन रस्ता क्रॉस करत आसतो !
विनु गेट जवळ येतो तो त्याला विचित्र दृश्य दिसत

रवी एका स्कूटीला धडकता धडकता वाचुन पाय सटकुन खाली बसलेला असतो ,
वही रस्त्याच्या एकाकडेला पडलेली असते  ,
आणी तो मुर्खासारखा स्कुटीवाल्या मुलीकडं बघत असतो
    विनुला विचित्र वाटत ती मुलगीही याच्याकड बघुन हसत असते
का कुणास ठाऊक जणु या आधी ते एकमेकांना ओळखात होते ?
पण हा सगळा विचार सोडुन विनु त्याच्याकड बघुन फिदी फीदी हसायला लागला !
साल्या तुला एक मिनीट एकट काय सोडल तु तर मरणाच्या दारातच येऊन टेकलास की रे!
कायम सोडून गेलो तर काय होईल , येडं कुठलं !
आणी पुन्हा हसला ,
रवी सावरुन उठला त्या मुलीला काही न बोलता फक्त हसला आणी मग विनुनी आधार देत ,
हात खांद्यावर घेऊन त्याला रुमवर नेल !
जाताना तो ही त्या मुलीकड पाहत होता ती भेट हृदयात साठवत होता ,
का कुणास ठाऊक विनुला प्रश्न पडला
ही तीची आणी त्याची पहीली भेट होती ?
मनानं उत्तर दिलं ......नाही निश्चितच नाही रे!

दुसर्या दिवशी
    ये विन्या चहा घे ना यार ,
अंथरुनातुन रवी आळसावुन बोलला ,
       साल्या मि काय तु झी बायको आहे काय ! येवढी order सोडायला !
   विनु चिडला !
love u जानु !  घे की  !
रवी ते ते मजाक करायला !
विन्या
जानु गेली खड्यात मि चहा आणतो तु ती डायरी काढ !
आता ग बया इसरेलच कि मी !
     रवी मिश्कीलपणा उफाळुन आला ,
विनु मात्र चिडला ,
       जाड्या चहा पाहीजे ना ,गुपचुप काढ डायरी  बाहेर
मि आणतोय चहा
च्यायला उगाच बोर माराययलाय!!
विनु चहा आणतो ,रवी वाचायला सुरुवात करतो ,
  तसा माझा अन कवितेचा काहीच संबंध नवता पण तिला भेटल्यावर
रवी पुढे  वाचु लागला ,
काही जणाना वाटत प्रेमात पडलं की
भावना शब्दांच्या अंगणात नाचु लागतात ,
आठवणीच्या निशाण्यावर शब्दाचे तीर भावनांच्या कमानीवर आरुढ होऊन मनास विद्ध करतात ,
गिरीनिर्झर हे धावत प्रेयसीला भेटायला निघालेल्या प्रियकरासारखे भासतात ,तर 
निरभ्र आकाश कुणी असंख्य युगुलांचे स्मृतीस्थानच वाटु लागते ,
वर दिसनारा प्रत्येक मेघ मेघदुता सारखा वाटत तिला संदेश पोचविल मनातला ?
पण या अलंकारिक कल्पना वरकरणी कितीही सुंदर वाटतील पण शाश्वत जगात असं काही नसत ना !

जगलो तुझ्यासाठी ,तु बघ जगुन मजसाठी
एकदाच
रडलो मि तुजसाठी,तु फक्त हुंदका काढ मजसाठी
एकदाच
बोललो असेल तुझ्याशी कितीतरी,
प्रेम व्यक्त करण्याची संधी दे
एकदाच
तु भेटलीस आयुष्यात अनेकदा,
             ती  पहीली भेट पुन्हा अनुभवु दे  एकदाच  !
..............

मि पुन्हा तिला भेटलो कॉलेजच्या introduction च्या कार्याक्रमाला

योगायोग ही गोष्ट सत्यात असते किंवा काय याबाबत शंका असली तरी माझ्याबाबतीत ही गोष्ट असावी अस वाटत ,
पण तीच नाव आगदी माझ्या नावाआधी आलं होतं म्हणजे हे मला माझं नाव आल्यावर कळलं हा ,
तिच्याबद्दल ती बोलताना मि तर मुग्ध होऊन जीव कानात अन डोळ्यात आणुन बघु लागलो ,
नंतर माझी बारी आ होती माझ नाव पुकारलं मि आपला निघालो ,
कसबस उभा राहुन नाव सांगितलं,समोरचे सगळेच चेहरे नविन होते एक सोडला तर ,
ततपप करीत सांगत होतो का कुणास ठाऊक पण माझ्याकडुन ती बोलली ते पुन्हा सेम बोलणं गेलं
बहुधा तिच्या लक्षात आल असाव
कारण ति हळु हसत होती ,
मि मात्र पोरीसारखा लाजुन थिजायचा बाकी होतो ,
कसबस उरकलं बोलणं मि
आणी जवळ जवळ पळत येऊन बेंचवर बसलो !
धाप लागली होती ,छातीत स्पंदने तीव्र गतीने धावत होती ,कपाळावर घर्मबिंदु येव्हाना जमा झाले होते आणी मि विचित्र मानसिकतेत होतो ,
हळुहळु वेळ झाली तशी स्पंदने कमी झाली तशी
कपाळावरील घर्मबिंदुंची गर्दी कमी होऊन मनात विचारांची गर्दी जमु लागली !
गर्दी ? हो गर्दीच ती कोणतीही दिशा नसलेले विचार जेव्हा मनात एकमेकांवर येउन आदळतात ना तेव्हा ती गर्दीच असते .
विचाराना एक मार्ग आणी लक्ष्य असेल तर विचार विचार ठरतो
नाही तर ती गर्दीच असते .
  परंतु नवीन मित्रांमुळे त्यात रमता मात्र आला नाही आणी कार्यक्रम संपला !

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...