तु माझी मि तुझा असावा
या चांदरातीला गंध असावा
रातराणीच्या कळ्याभोवती
गुणगुणणारा भ्रमर असावा !
तु माझी मि तुझा असावा
हृदय अशी तु मी श्वास असावा
तव कृष्णअक्षातील दृश्य मनोहर
निरभ्र चमचम आकाशातील
द्वितीयेचा मी चंद्र असावा !
तु माझी मि तुझा असावा
तु नसताना ,
भरतीस आलेला सिंधु असावा,
मन लाटा ह्या अतिउंच उठाव्या
प्रहारती जरी कड्याभोवती
ते साहणारा मि सह्य असावा ।
No comments:
Post a Comment