Bachelor ते bachelor असतात
नसली दमडी खिशात
तरी श्रीमंताचे बाप असतात
हो
उद्योगपतीचे बाप असतात कारण असे उद्योग सांगा कुणाचे पती करतात?
सेमचे चार महीने आठवड्याला इवेंट करतात
लेक्चर सोडुन कालेजचे सोशल गोष्टी करित बसतात
कारण
bachelor ते bachelor असतात
ह्यांचे डोके म्हणजे लेकाहो f 1 च्या
सुसाट भन्नाट गाड्या असतात
पारा कॉलेजच्या दररोज विधानसभा भरवित असतात
हो विधानसभा भरत असतात
अन ह्या सभेतले आमदार दररोज विधेयक पारीत करतात!..
डिग्रीच्या कुंडलीत hod असतो शनी
पण त्यालाही चुना लावुन
कुंडलतल्या स्टोर रुमला शिफ्ट कृरतात
कारण
bachelor ते bachelor असतात
असते पँट एकाची कधी तर शर्ट दुसराच कुणाचा
रुम असतो एकाची ,रहीवास अख्या वर्गाचा
दिसला भंडारा कुठे गल्लीत ,
साले लगेच पंगतीवर डल्ला मारतात कारण .
bach.
..,
bachelor ते bachelor असतात
ते क्षणक्षण आयुष्याचे सोनेरी असतात
नसते लाज ना पैसा कसला मनाने साले श्रीमंत असतात
कारण
जो सुगंध मैत्रीचा जो जोश तारुणतेचा
जसा bachelor घेतात
तसा सांगा कुठे किती रुपयाला विकतात!
बाजीराव©
No comments:
Post a Comment