औरंगजेब पण राजांना पुरता ओळखुन होता
कारण पुढील पत्रातुन सहज लक्षात येतय की औरंगजेब रयतेचा छळ मांडुन शिवाजीराजाना डिवचतोय ,
त्याला माहीती असाव ह्या राजास गडकोटाहुन सकल राज्याहुन ही प्रजा प्रिय .
एरवी स्वतःस रहमदिल जिंदापीर म्हणविणारा
माणसांची बेरहम कत्तल करण्याचे हे आदेश देतो
आणी एकीकडे मात्र चटया विणीत,टोप्या विणुन त्या विकुन येणाऱ्या पैशात उदरनिर्वाह करतो असे ढोंग करतो
स्वतः मनुची देखील हेच म्हणतो की
आपण सन्यस्तवृत्तीचे आहोत असे ढोंग करी !
या नंतरही तो पीर कसा !
आपल्या कडील संतांची व्याख्या (समःशत्रौचमित्रेच....)
बहुधा यांच्याकडे चालत नसावी म्हणुननच हा सन्याशी कत्तलीचे आदेश देतो
एक गोष्ट मात्र निश्चित असावी की
मराठी सैन्याच मानसिक बल कमी करण्यासाठी आणी दहशत बसविण्यासाठी हा आदेश आहे !
संदर्भ
शिवकालीन पत्रसारसंग्रह
असे होते मोगल..
No comments:
Post a Comment